आता दुबई फ्रेमच्या ब्रिजवर तुम्ही करू शकता ब्रेकफास्ट

Image source : Google Images

दुबई फ्रेम जगातील सर्वात मोठा पिक्चर फ्रेम म्हणून मानले गेली आहे. झबील पार्कमध्ये उंच उभे असलेले, हे दुबईतील सर्वाधिक पाहिले जाणारे पर्यटन स्थळ आहे.

आता आपण दुबई फ्रेमच्या १५० मीटर उंच ग्लास पुलावर ब्रेकफास्टचा आनंद घेऊ शकता. दुबईमध्ये सूर्योदयाच्या सुंदर दृश्यांसह नाश्त्याचा आनंद लुटणे ही एक मजेदार कल्पना आहे!

Advertisement

दुबईच्या नगरपालिकेने दुबई फ्रेममध्ये नाश्ता करण्याचा एक अनोखा अनुभव देण्याची घोषणा केली असून त्या थीम चे टायटल ’45 मिनिट्स ऑफ गोल्ड’ असे आहे.

पर्यटकांना ट्विन टॉवरवरून जुन्या आणि नवीन दुबई दोघांनच्या ही उत्कृष्ट दृश्यांचा आनंद घेता यावा यासाठी या उपक्रमामागील कल्पना आहे.

Advertisement

दुबई फ्रेमला ब्रेकफास्टसाठी हा उपक्रम ४ डिसेंबरपासून सुरू होईल आणि दर शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत उपलब्ध असेल.

पर्यटकांना पुरेसे सामाजिक अंतराचे नियम आणि इतर कोविड -१९ सुरक्षा प्रोटोकॉल पाळावे लागतील. जे जाण्यासाठी इच्छूक आहेत ते दुबई फ्रेमच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट बुक करू शकतात.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here