‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये होणार दयाबेन ची धमाकेदार एन्ट्री? वाचा पूर्ण माहिती!

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Image Source: India TV News

हिंदी मालिकांमध्ये सर्वात जास्त गाजलेली मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ने बारा वर्ष आणि तब्बल तीन हजार एपिसोड पूर्ण केले. या निमित्ताने चाहत्यांनी शो निर्मात्याचे अभिनंदन केले आणि खूप आग्रह ही केला की तीन वर्षां पासून मालिके मधून गायब असलेली दयाबेन या पात्राला परत आणा. चाहत्यांची ही इच्छा सोशल मीडियावर खूप ट्रेन्ड झाली आहे.

मालिकेचे प्रोडूसर असिद कुमार मोदी यांनी फॅन्सला मनापासून धन्यवाद दिले आणि नवरात्री किंवा दिवाळीपर्यंत शोमध्ये दयाबेन ची एन्ट्री होणार असे त्यांनी आश्वासन दिले. काही दिवसांपूर्वी त्यांनी हेही सांगितले होते की दिशा वकानी आणि त्यांच्या परिवाराशी आमची चर्चा सुरू आहे, पण आतापर्यंत काहीच निर्णय झालेला नाही.

Advertisement

दिशा वकानी यांनी तीन वर्षां पूर्वी मैटरनिटी लिव्ह घेतली होती. तीन वर्षां पासून निर्मात्त्यांनी दिशाला मालिकेत परतण्यास खूप आग्रह ही केला पण दिशाने आपल्या बाळा कडे लक्ष्य ठेवायचं आहे असे सांगून परत येण्यास आजून वेळ मागितला.

एवढा प्रसिद्ध शो, मुख्य आणि धमाकेदार किरदारा शिवाय चालू शकत नाही. जर दिशा परत येऊ शकली नाही तर आम्हाला दुसरी दयाबेन शोधावी लागणार असा मेकर्सचं निर्णय घेतला आहे. दिलीप जोशी (जेठालाला) आणि दिशा वकानी (दयाबेन) ही दोन व्यक्ती या शोमध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहे.

Advertisement

लोकांच्या मतानुसार हेच दोन लोक आहे जे त्यांना या कार्यक्रमाशी जोडुन ठेवतात, म्हणून दयाबेनला परत आणणे गरजेचे आहे. खूप हसवणारी ही लोकप्रिय मालिका आता बोरिंग झालेली आहे असंही मत काही लोकांनी व्यक्त केलं आहे.

काही दिवसांपूर्वी नेहा मेहता (अंजली मेहता) आणि गुरुचरण सिंग (रोशन सोधी) यांनी शो ला रामराम ठोकला. त्यांच्या जागी दुसऱ्या कलाकाराला संधी दिली गेली, पण चहात्यांना ते काही पचलं नाही.

Advertisement

निर्माते म्हणाले की ‘ज्यांना जायचे आहे, त्यांना आम्ही थांबवू शकत नाही आणि आपल्याला पुढे चालावेच लागेल’. काही दिवसांनी नेहा मेहता ने परत येण्याची इच्छा देखील व्यक्त केली पण निर्मात्यांनी त्यास नकार दिला.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here