पुण्यातील शिक्षण संस्थेचं जाळं पश्चिम भागातच का? जाणून घ्या

BMCC College Pune
Image Source: Google Images

स.प.महाविद्यालय, लॉ कॉलेज, कृषी महाविद्यालय, ना.दा ठाकरसी महाविद्यालय, कॉमर्स कॉलेज ही बहुतेक महाविद्यालय पुण्याच्या पश्चिम भागात आढळतात. त्याचप्रमाणे भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, गोखले राज्यशास्त्र-अर्थशास्त्र संशोधन संस्था याच विभागात स्थापन झाल्या होत्या. तसेच शहरातील प्रमुख शाळा सुद्धा याच भागात आढळतात.

यामुळे पुणे शहराचा पश्चिम भाग हा शौक्षाणिक क्षेत्र म्हणून संबोधला जाई. याचे प्रमुख कारण म्हणजे पुण्याच्या या सर्व संस्था स.न. १८८० नंतर जन्माला आलेल्या आहेत. या काळात शिक्षणक्षेत्रामध्ये मोठ-मोठ्या सुधारणा होऊ लागल्या होत्या यामुळे संस्थेस भरपूर जागा, मोठ-मोठी पटांगणे, मोकळी हवा आवश्यक होती व १८८० नंतर अशा प्रकारची जागा फक्त पुणे शहराच्या पश्चिम भागातच उपलब्ध होती.

Advertisement

पूर्व भागाची वाढ जवळ जवळ संपुष्ठात आली होती कारण त्यापलीकडे लष्कराची हद्द असल्याने तिकडे नव्या वस्तीला मज्जाव होता व दुसऱ्या भागात स्टेशन पलीकडे जाणे फार दूर वाटे.

शिक्षण संस्था शहरा पासून दूर असणे इष्ट नसते व त्यावेळी शहराचा पश्चिम भाग हा वाढीला लागला होता. तसेच शिक्षण संस्थाना आपला प्रपंच मांडायला भरपूर जागा होती. या शिवाय डेक्कन भागातील जमिन ही मुरबाड असल्या कारणाने इमारतीच्या पाया भरणी साठी उत्तम होती व यामुळेच बऱ्याचश्या शिक्षण संस्था ह्या पुण्याच्या पश्चिम भागात अढळतात.

Advertisement

पुण्याच्या पश्चिम भागातील या शिक्षणसंस्था मुळे या भागात विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता व या कारणाने या भागात उपहारगृहे, खानावळी, कॅन्टीन, लाँड्री या व्यवसायांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला व हा पुण्याचा पश्चिम भाग मोठ्या प्रमाणावर सधन झाला.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here