नकाशा चा शोध कोणी लावला? कसा होता जगातील पहिला नकाशा? जाणून घ्या

Image Source: Google Images

कुठे जायचं? कसं जायचं? … जवळपास आणखी काय आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला एका छोट्याशा स्क्रीनवर अगदी सहजपणे मिळतात. आता तर कोणत्या वाहनाने गेले तर कीती वेळ लागेल, कोणता पर्यायी मार्ग आहे, कुठे जास्त ट्रॅफिक आहे यांची देखील उत्तरं सहज मिळायला लागलीत. या सर्वांचा आधार आहे नकाशा.

सगळं सहज माहित होत असल्याने असेल पण हा नकाशा जो आज क्षणाक्षणाला जगभरातून लोक त्यात गरजेची माहिती अपडेट करत असतात तो पहिल्यांदा बनला कसा? किंवा त्याची संकल्पना नक्की कोणाची होती?

Advertisement

आपले विचार आकृत्यांच्या द्वारे व्यक्त करण्याची कला मानवामध्ये फार पूर्वीपासून आढळते. एस्किमो आणि बेदूईन यांसारख्या अप्रगत जमातींतील लोकांतही नकाशा काढण्याचे कौशल्य जात्याच असते, हे त्यांनी काढलेल्या काही नकाशांवरून दिसून येते. जगातील पहिला नकाशा बनविण्याचं श्रेय ग्रीक तत्वज्ञ ऍरेस्टोस्थानस याला दिलं जातं.

इसवीसनपूर्व २७६ मध्ये त्यांनी पृथ्वीच्या परिघाचं जवळजवळ अचूक मापन केलं होतं त्या पद्धतीमुळेच दक्षिण ते उत्तर मापन करणे शक्य झाले. त्यांनी पृथ्वीला गोल मानून ते मापन केले यामुळेच त्यांना आणि त्यांनी तयार केलेल्या नकाशाला पहिल्या नकाशाचे स्थान दिले जाते.

Advertisement

त्यांच्या आधी साधारण ४०० वर्ष पूर्वी अनाक्सीमॅन्डर ह्या ग्रीक माणसाने नकाशा बनवला होता पण पृथ्वी त्याच्या मते दंडाकार असल्याने त्या नकाशाला ग्राह्य धरलं जात नाही. ऍरेस्टोस्थानस च्या काळाच्या आसपासच हिप्पार्कसनं पृथ्वीचे समान भाग करण्यासाठी अक्षांश आणि रेखांशाची कल्पना मांडली.

टॉलेमीने या संकल्पनेला धरून अक्षांश आणि रेखांश या समांतर रेषा असणारा पहिला नकाशा तयार केला. त्या वेळी ज्ञात असलेल्या जगाचा तो नकाशा होता त्यामुळे अमेरिका खंडांचा त्यात समावेश नव्हता.

Advertisement

ज्ञात नकाशाचा इतिहास मात्र यापेक्षा अधिक जुना आहे. इजिप्तमध्ये सुमारे चार हजार वर्षांपूर्वी बनवल्या गेलेल्या नकाशांचे अवशेष मिळाले आहेत. त्याचा नकाशाकार कोण होता हे मात्र उलगडलं नाही त्यामुळे जगातले आद्य नाकाशकार मात्र अनामिकच राहिलेत.

त्या काळात इजिप्त मधील शेतकरी आपल्या शेताच्या सीमारेखा आखून घेत आणि मग राजा त्या सीमारेखा त्या संपूर्ण प्रदेशातल्या नकाशावर कोरून टाकत असे. हे नकाशे मातीच्या तुकड्यांवर रेखाटून भट्टीत तो तुकडा भाजला जाई आणि दीर्घकाळ उपयोगी पडणारा नकाशा तयार होत असे. ईजिप्तमधील उत्खननांमध्ये अशा नकाशांचे अनेक अवशेष मिळालेले आहेत.

Advertisement

प्रवाशांना मार्गदर्शन म्हणून नकाशे तयार करण्याची कल्पना बरीच जुनी आहे. प्राचीन ॲसिरियामध्ये इ. स. पू. १८०० च्या काळातील मातीची एक जुनी वीट सापडली असून तिच्या पृष्ठभागावर मेसोपोटेमियाचा उत्तर भाग रेखांकीत केला आहे. हार्व्हर्ड विद्यापीठाच्या सेमेटिक संग्रहालयात अशीच एक दुसरी वीट ठेवली असून ती इ. स. पू. २५०० च्या काळातील आहे. इ. स. पू. पाचव्या शतकात ग्रीक लोकांना फक्त पूर्वेकडील सिंधू नदीपासून पश्चिमेकडे अटलांटिक महासागरापर्यंत पसरलेला प्रदेश ज्ञात होता.

त्यापुढील शतकात पृथ्वी ही गोल तबकडी नसून चेंडूसारखी वाटोळी आहे, ही कल्पना प्लेटोने आपल्या लिखाणात मांडलेली आढळते. पण या कल्पनेचा मूळ जनक कोण, याबद्दल वाद आहे. पुढे इ. स. पू. ३५०० मध्ये ॲरिस्टॉटलने पृथ्वी वाटोळी आहे हे पुराव्यानिशी सिद्ध केले. पृथ्वीच्या परिभ्रमणाची कक्षा लंबवर्तुळाकार आहे हे सिद्ध केले जाऊन, निरनिराळ्या स्थानांचे अक्षांश निश्चित केले गेले.

Advertisement

अशा रीतीने पृथ्वीबद्दलच्या ज्ञानात भर पडत गेली. नकाशे काढण्याचे शास्त्र चीनमध्येही फार पूर्वीपासून अस्तित्वात होते, असे दिसते. इ. स. पू. २२७ च्या सुमारास चिनी वाङ्‌मयात नकाशाबद्दल उल्लेख आढळतो. पुढे कागदाचा शोध लागल्यावर (इ. स. सु. १०५) चिनी साम्राज्याच्या निरनिराळ्या भागांचे स्थानिक नकाशे तयार होऊ लागले.

इब्न हौकल (दहावे शतक) या अरब ग्रंथकाराच्या सुरत-अल्-अर्ज या ग्रंथात सिंधचा नकाशा आहे. तो एलियट व डौसन यांनी प्रकाशित केलेल्या हिस्टरी ऑफ इंडिया ॲज टोल्ड बाय इट्स ओन हिस्टोरियन्स या मालेच्या पहिल्या खंडात (पृ. ३२ व ३३ मध्ये) प्रसिद्ध झाला आहे. समरकंदचा रहिवासी ऊलुगबेग याने तत्कालीन ज्ञात असलेल्या जगातील अनेक स्थळांचे अक्षांश-रेखांश दिले आहेत.

Advertisement

त्याला झीज-इ-ऊलुगबेग (झीज ऊलुगबेग) असे म्हणतात. हा १४३७—३८ मध्ये तयार झाला. अकबराच्या कारकीर्दीत अबुल फज्लने केलेल्या आईन-इ-अकबरीमध्ये भारतातील व भारताबाहेरच्या कीत्येक स्थळांचे अक्षांश-रेखांश दिले आहेत. जहांगीराच्या काही चित्रांत त्याचे जहांगीर (जगज्जेता) हे नाव सार्थ आहे हे दाखविण्यासाठी त्याच्या हातात पृथ्वीचा गोल दिला आहे.

या गोलावर त्या वेळी ठाऊक असलेले जग अक्षांश-रेखांशांच्या साहाय्याने दाखविले आहे.

Advertisement
Image Source: Google Images

महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेर भारतात मध्ययुगात डोंगरी वा भुईकोट आणि पाण्यातील कील्ल्यांना विशेष महत्त्व असे. म्हणून अशा कील्ल्यांचे किंवा काही यात्रास्थानांचे आराखडे काढलेले आढळतात. ते भारतीय किंवा प्रादेशिक नकाशांचे मूळ समजण्यास हरकत नाही.

येथे जे भारतीय ज्योतिषी होऊन गेले, त्यांपैकी काही ज्योतिषांकडे ॲस्ट्रॉलेब नावाचे एक किंवा अनेक तबकड्या असलेले यंत्र असे. त्यावर अक्षांश-रेखांश काढलेले असत, तर काही तबकड्यांवर भारतातील काही नगरांचे अक्षांश-रेशांशही दिलेले आढळतात. ॲस्ट्रॉलेबची कल्पना पाश्चात्त्यांकडून घेतलेली असावी असं वाटतं.

Advertisement

दोन ठिकाणांमधील अंतर दाखविणे आणि दिशा दाखविणे हे नकाशाचे मूळ उद्देश. फार पूर्वी हे अंतर वेळेच्या एककात दाखविले जाई जसे की ‘अ’ या स्थानापासून ‘ब’ हे स्थान २ दिवसांच्या अंतरावर आहे. परंतु एकाच नकाशात वेळेचं हे प्रमाण एकाच अंतरासाठी वेगवेगळे राही.

यामागचे प्रमुख कारण हे जमिनीच्या उंचसखलपणामुळे लागणार वेळ होता. दिशा दाखविणे मात्र त्याकाळात तेवढे महत्वाचे मानले जात नसावे… त्याच्या अचूकतेबद्दल देखील शंका होत्या. परंतु तेराव्या शतकापर्यंत अचूक दिशा दाखविण्याचा प्रयत्न दिसून येत नाही. जेव्हा होकायंत्राचा शोध लागला त्यानंतर अचूक दिशा दाखविणे शक्य झाले.

Advertisement

जगाचा नकाशा जेव्हा नव्याने तयार केला गेला तेव्हा दिशा, अंतर, अक्षांश-रेखांश या साऱ्या गोष्टींचा विचार केला गेला. नकाशांचं संकलन असलेला पहिला ग्रंथ बेल्जीयममधील अँटवर्प शहरातील अब्राहाम ऑर्टेलिस यानं सन १७५० मध्ये तयार केला.

पहिला आधुनिक नकाशाकार म्हणून त्याला मानलं जातं परंतु पहिला अधिकृत ऍटलास बनविण्याचं श्रेय मात्र गेरार्डस मर्काटर याला दिलं जातं. त्यानं पहिला तपशीलवार ग्रंथ तयार केला. त्या ग्रंथाच्या पहिल्या पानावर त्यानं ग्रीक पुराणकथेतील ऍटलासनं तोलून धरलेल्या पृथ्वीचं चित्रं दिलं होतं. तेव्हापासून नकाशाच्या संकलनांना ‘ऍटलास’ असे म्हणण्याचा प्रघात पडला.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here