आम्ही, कोरोना आणि Memes

Image Source: Google

भारतात तशी गुणवत्तेची कमतरता नाहीच. वेळ – परिस्थिती कोणतीही असो वेगवेगळ्या माध्यमातून मनोरंजन, जागृती आणि विचारांची देवाणघेवाण हि गोष्ट अगदी जनमानसात खोल रुतलेली आहे …. पहिल्या दोन ओळी वाचताना वाटत असेल अरे बापरे कोणता अवघड विषय आणलाय समोर..? सगळ्या अवघड विषयांना सोप करणारे आणि या लॉक डाऊन चा काळात मनोरंजन व जागृती करणारे सगळ्यांचे आवडते मिम्स हा आजचा विषय.

मिम्स हे प्रकरण तस जूनच.. पण सोशल मिडिया चा व्याप वाढला आणि ते हाता- हातात पोहचल. तर या मिम्स ची आठवण आता आली कारण ‘करोना आणि त्या निमित्त झालेले लॉकडाऊन’. कधी नव्हे ते सगळ्या वयोगटाचे लोक एका जागी, एकाच छताखाली माहित नसलेल्या काळासाठी एकत्र आले. रोज तस वेगळ म्हणावं असे करून करून दिवस निघतात आहे. जून ते सोन म्हणत काही जण जुन्या पदार्थ, खेळ, मालिकातून जुन्या आठवणीना उजाळा देताय तर जुनी पिढी टेक्नॉलॉजीने पुढे गेलेल्या नव्या पिढी सोबत नव्या गोष्टींतून मनोरंजन करतेय आणि अर्थात मिम हा त्याचा अविभाज्य घटक आहे.

Advertisement

तर कोरोना च्या मिम्स चा प्रवास चालू झाला जसा कोरोनाने भारतीयांच्या मोबाईल मध्ये पाउल ठेवला तसा… आणि आता वर्षानुवर्षे जिथे जिथे त्याचा संबंध जोडता येईल तिथ पर्यंत तो पोहचेल, कोरोना पेक्षा जास्त वेगाने.

कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि पुणे शहरात शाळांना सुट्टी, वर्क फ्रॉम होम अशा गोष्टीना सुरुवात झाली. दुसऱ्याच दिवशी शाळा आणि कॉलेज ला सुट्ट्या जाहीर झाल्या. 

Advertisement

अत्यावश्यक गोष्टींचा नावाने गरज नसतांना पण अनेक लोक अधिक प्रमाणत गोष्टींचा साठा करू लागले आणि इकडे मिमर्स ला खाद्य मिळाले.

ह्या सगळ्या पाठोपाठ लोकांची पुढच्या संभाव्य घटना पाहता गावी जाणाऱ्यांची संख्या वाढली. बातम्या पाहून आणि सोशल मिडिया वर येणाऱ्या गोष्टीमुळे परगावी असणाऱ्या  आपल्या जवळच्या लोकांना घाई करू लागले. ह्या प्रसंगी “… भेटेल ती गाडी पकडून ये संघटना “ हा शब्दप्रयोग केला होता. हे वाढते प्रकार पाहता पंतप्रधानानी रात्री आठ ला संवाद साधणार असल्याचे सांगितले, पंतप्रधान आणि आठ चा आकडा यांचा संबंध पाहता पहिले पोटात गोळा आला आणि भूतो न भविष्यन्ति अस काहीतरी घडू शकत अस मनोमन वाटू लागलं. 

Advertisement

२२ तारखेच्या लॉकडाऊन ची अत्यंत महत्वाची घोषणा केली त्या सोबतच ५ वाजता थाळीनाद करण्याचे पण आवाहन केले, कृतज्ञतेची ती भावना दुसऱ्या दिवशी लोकांनीउत्सवात परिवर्तीत केली .. यावर परिस्थितीवर खूप मार्मिक भाष्य करणारे मिम्स पाहायला मिळाले.

पंतप्रधान पुन्हा लॉकडाऊन नंतर एकदा संवाद साधायला आले आणि आधीच्या दिवसाचा उत्सव पाहता जो निर्णय अपेक्षित होता तोच झाला.. आणि सक्तीची संचार बंदी लागू झाली. संपूर्ण लॉक डाऊन चे पाउल भारत सरकारने उचलले.

Advertisement

आता २१ दिवसाचा हा कालावधी झाला. एकवीस दिवस काय, आजकालच्या धावपळीच्या जगात सगळी घरातली लोक, शांततेत एका जागी, एका छताखाली राहिली नव्हती. पण या लॉक डाऊन ने हे घडवलं, नवी पिढी जुने खेळ, पदार्थ यासह जुन्या आठवणी जाग्या करत होती तर जुनी पिढी नव्या टेक्नॉलॉजी ला समजून घेत वेळ घालवते आहे, टीव्ही चा मालिका बंद झाल्यावर एकत्र रामायण, महाभारत पाहताय तर काही वेळ hotstar, नेटफ्लिक्स वर वेळ घालवता आहेत. आणि या सगळ्यांना जोडून ठेवलय ते मिम्स ने, एकटाच वाचून हसणारी {वर्च्युअल जगात} पिढी एकत्र बसून एकमेकाला ऐकवताय.

दुसऱ्या बाजूला जागृतीच काम पण जोरदार चालू आहे, लोकांनी घरात राहावं यासाठी, “ पुढच्या वर्षी खायचा असेल आंबा, तर काही दिवस घरातच थांबा”, “काही दिवस घरातच थांबा नाहीतर dp वरील फोटोला हार घालण्याची वेळ येईल”, “ हा एकमेव आजार आहे ज्याचा उपचार डॉक्टर नाही तर पोलीस करत आहेत” तर काही जण शब्दांचे प्रयोग करत कोरोना बद्दल जागृती करत आहेत.

Advertisement

अजूनही रिकामा वेळ खूप उरतोय आणि अर्थात या वेळेत कोण काय करतंय, करू शकत याच्या रंजक कल्पना पण मनोरंजन करत आहेत. जसे कि , एका आगपेटीत किती काड्या आहेत, पंखा बंद व्हायला किती वेळ लागतो, अगदी सेकंदात मोजून सांगताय तर “जेवण, झोपण आणि मोबाईल हे माझ रोजचं काम देश वाचविण्याचा कामी येईल” अस विनोदाने म्हणत आहेत. 

घरातच राहा, सुरक्षित राहा हे सांगताना चित्रपट संवाद, कलाकार हे पण मागे नाही.

Advertisement

राजकारण, राजकीय प्रतिनिधी आणि निर्णय हे तर आवडते विषय. कोरोनाचा संबंध जोडताना यातही मागे नाहीत. नेहमी प्रमाणे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघातील समर्थक तावातावाने तर कधी हळूच चिमटा काढत बोलत आहेत हे मात्र खर. फक्त मागच्या चार वर्ष पेक्षा त्याची तीव्रता आणि संख्या मात्र कमी झाली आहे.

जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच लोक, सत्ताधारी, विरोधक आणि सरकारी यंत्रणा एका बाजूला आहेत हे मात्र खरे. भारतीय माणूस प्रचंड आशावादी असतो हे तर सर्वश्रुत आहेच, ते आता पाहायला पण मिळाल. या साऱ्या घडामोडीतही चांगल शोधण मात्र त्याने सोडला नाही. निसर्गाचा विचार, कुटुंब, गरजा, संस्कृती अशा कठीण पण जिव्हाळ्याच्या विषयांना त्याने मार्मिक आणि तितक्याच विनोदी पद्धतीने मिम्स मधून समोर आणले. हे सांर लवकरच संपेल आणि आपण पुन्हा नव्या जोमाने उभ राहू अशी आशा करूया. 

Advertisement

आणि हो यात tiktok चे विडीओ चा कलाकृतींचा आढावा नाही.. तो वेगळा मोठा विषय बनेल.

STAY AT HOME, STAY SAFE

Advertisement

घरात राहा सुरक्षित राहा.

Advertisement