7 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
मुंबईच्या लोकलमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत मुंबईतील प्रसिद्ध ‘द गाय इन अ स्कर्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेला शिवम भारद्वाज दिसत आहे. शिवम एक फॅशन ब्लॉगर असून अप्रतिम मेकअप व्हिडिओ शेअर करत असतो.
असाच एक शिवमचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कारण शिवमने स्कर्ट घालून मुंबई लोकलमध्ये कॅटवॉक केला आहे. प्लाई स्कर्ट आणि गॉगल घालून शिवमचा वॉक पाहून ट्रेनमधील सर्व लोक अचंबित झाले. ट्रेनमधील प्रवाशी कॅटवॉक करणाऱ्या व्यक्तीकडे पाहू लागले. काही लोकांनी तर मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केला. त्यामुळे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
लोक म्हणाले- काय तो आत्मविश्वास…
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओला लोकांनी अनेक कमेंट दिल्या आहेत. हजारो लाईक मिळाले आहेत. लोक म्हणाले काय तो आत्मविश्वास म्हणावा.
मुलींचे कपडे घातल्याने खूप संघर्ष केला
मुळात या प्रतिभावान व प्रसिद्ध झालेल्या फॅशन ब्लॉगरचे सुरूवातीचे जीवन फार कठीण गेले आहे. कारण, महिलांचे कपडे घालून फॅशनकडे वळल्यामुळे त्याला घरातून हाकलून देण्यात आले. मुंबईत आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी शिवमने चांगला संघर्ष घेतला. अखेर शिवमने सिटी ऑफ ड्रिम्समध्ये आपला ठसा उमटवला.
हे ही वाचा
प्रेमा तुझा रंग कसा…:4 मुलांची माता असणाऱ्या 42 वर्षीय महिलेचे जडले लेकाच्या मित्रावर प्रेम, केला विवाह; सामाजिक टीकेला ठेंगा
एका 42 वर्षीय महिलेने आपल्याच मुलाच्या 24 वर्षीय मित्राशी लग्न केल्याची अजब घटना घडली आहे. या लग्नामुळे आता या जोडप्याला सामाजिक टीकेचा सामना करावा लागत आहे. महिलेला 4 मुले आहेत. तर तिच्याशी लग्न करणारा मुलगा 24 वर्षांचा आहे. – येथे वाचा संपूर्ण बातमी