VIDEO : नेपाळच्या महिला बोलरचं मैदानातच ‘पुष्पा सेलिब्रेशन’, ICC ने पोस्ट केला व्हिडिओ


Advertisement

IPL 2022 : क्रिकेटमध्ये मैदानात (Cricket matches) खेळाडूंचा दमदार खेळ जितका गाजतो तितकंच अनेकदा हटके सेलिब्रेशनही गाजतं. मागील काही काळापासून दाक्षिणात्य सिनेमा पुष्पा सिनेमाशी (Pushma Movie) संबधित सेलिब्रेशन चांगलच गाजतंय. भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाने सुरुवात केल्यानंतर डेव्हिड वॉर्नरसह अनेकांनी पुष्पा सिनेमाप्रमाणं सेलिब्रेशन (Pushpa Celebration) केलं आहे. आता एका महिला खेळाडूनेही मैदानात हे सेलिब्रेशन केलं आहे. नेपाळची महिला क्रिकेटर सीता राणा मगर हिने फेअरब्रेक इनव्हायटेशनल टूर्नांमेंट (FairBreak Invitational Tournament) या दुबईत सुरु असलेल्या क्रिकेट स्पर्धेत हे सेलिब्रेशन केलं आहे.

टोर्नाडोज वूमन (Tornadoes Women) संघाकडून खेळताना सीताने सॅफायर्स संघाविरुद्ध (Sapphires) अप्रतिम कामगिरी केली. यावेळी प्रतिस्पर्धी संघातील एका खेळाडूला पायचीत केल्यानंतर सीताने आनंद साजरा करताना दमदार सेलिब्रेशन केलं. तिने पुष्पा सिनेमातील हिरो अल्लू अर्जून करतो त्याप्रणाने हात हनुवटीखालून फिरवण्याची अॅक्शन केली. दरम्यान या सर्वाचा व्हिडीओ आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीने (ICC) सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यावेळी सोशल मीडियावर हे सेलिब्रेशन फार प्रसिद्ध होत असल्याचा उल्लेख देखील आयसीसीने केला आहे. 

Advertisement

पाहा व्हिडीओ- 

Advertisement

‘या’ खेळाडूंनीही केलं आहे पुष्पा सेलिब्रेश

क्रिकेटच्या मैदानात पुष्पा सिनेमा आल्यापासून या सेलिब्रेशनची क्रेज आली आहे. आधी स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाने ही स्टाईल करण्यास सुरुवात केली. मग दिल्लीकडून सामना जिंकल्यावर डेव्हिड वॉर्नरने देखील हे सेलिब्रेशन केलं होतं. मग कोलकात्याविरुद्ध मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) राजस्थान संघाला अखेरच्या षटकात सामना जिंकवणाऱ्या ओबेड मॅकॉयनं देखील पुष्पा सेलिब्रेशन केलं होतं. तर हार्दिक पंड्याने मैदानात नाही तर त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत पुष्पाची स्टाईल मारली होती. 

Advertisement

हे देखील वाचा-

AdvertisementSource link

Advertisement