उत्तराखंडमधील मोटरेबल सस्पेन्शन पूल पर्यटकांसाठी खुला…

Image Source: Google Images

उत्तराखंडमधील भारतातील सर्वात प्रदीर्घ मोटरेबल सस्पेन्शन पूल आता जनतेसाठी खुला आहे. टिहरी तलावाच्या वर स्थित, ७२५ मीटर लांबीच्या डोब्रा-चांटी सस्पेन्शन पुलाला २.९५ कोटी रुपये खर्च करुन बनवायला १४ वर्षे लागली आहेत.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी नोव्हेंबर रोजी उद्घाटन सोहळ्याची घोषणा करण्यासाठी एक ट्विट केले होते, ज्यात कॅबिनेटचे मंत्री सुबोध उनियाल, धनसिंग रावत आदी उपस्थित होते.

Advertisement

डोब्रा-चांटी सस्पेन्शन पूल टिहरी गढवाल जिल्हा मुख्यालय आणि प्रताप नगर दरम्यानचा रस्ता जोडणारा असेल. यामुळे टिहरी ते प्रताप नगर दरम्यानचा प्रवास ५ तासांवरून केवळ १.५ तासांपर्यंत कमी होईल.

पुलाचे उद्घाटन उत्तराखंडसाठी ऐतिहासिक क्षण होता. विकासासाठी पुलाचे नवीन मार्गही उघडले जातील. हे सिंचनासाठी वीज आणि पाणी दोन्ही पुरवणार आहे.

Advertisement

मुख्यमंत्री त्रिवेन्द्रसिंग रावत यांनीही सांगितले की,”टिहरी तलाव हे पर्यटनस्थळांचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. झोर्बिंग, बोटिंग, वॉटर स्कीइंग, बोट राइड, पॅराग्लाइडिंग इत्यादी उपक्रमांसाठी लोक या ठिकाणी जातात.

आता पूल तयार झाल्यामुळे या जागेवर बरेच पर्यटक आकर्षित होतील अशी अपेक्षा आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here