uber cup final indian women s team fails to win match against korea zws 70 | उबर चषक बॅडिमटन स्पर्धा : कोरियाविरुद्ध महिला संघाची पाटी कोरीबँकॉक : दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावरील अ‍ॅन सेयंगचा अडथळा ओलांडण्यात पुन्हा अपयशी ठरली. परिणामी बुधवारी उबर चषक महिला बॅडिमटन स्पर्धेच्या ड-गटातील अखेरच्या साखळी लढतीत भारताने कोरियाकडून ०-५ अशी हार पत्करली.

Advertisement

भारताला उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल करण्यापूर्वी हा धोक्याचा इशारा मिळाला आहे. सिंधूने सेयंगविरुद्धच्या सामन्यात १५-२१, १४-२१ असा पराभव पत्करला.

ली सोहली आणि शिन सेयंगचॅन जोडीने ३९ मिनिटांत श्रृती मिश्रा आणि सिमरन सिंघी जोडीला २१-१३, २१-१२ असे हरवले.

Advertisement

आकर्षी कश्यप किम गा ईयुनविरुद्ध १०-२१, १०-२१ अशी अपयशी ठरली. मग किम ही जीआँग आणि काँग हीयाँग जोडीने तनिशा क्रॅस्टो आणि त्रिसा जॉली जोडीला २१-१४, २१-११ असे हरवले. अखेरच्या एकेरी लढतीत अश्मिता छलिहाने सिम युजिनकडून १८-२१, १७-२१ असा पराभव पत्करला.

Source link

Advertisement