टायटन घेऊन येत आहे कॉनटॅक्टलेस पेमेंट वॉच – काय आहेत वैशिष्ठे? जाणून घ्या

Titan Contactless Payment Watch
Image Source: Zee News

टायटनने भारतात कॉन्टॅक्टलेस पेमेंट फंक्शनॅलिटीसह पाच नवीन घड्याळे घेऊन येत आहे. ही घड्याळे कॉन्टॅक्टलेस पेमेंट करण्यासाठी सक्षम असतील, वॉच कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत भागीदारी केली आहे.

घड्याळ बघण्यासाठी येथे क्लिक करा

Advertisement

पेमेंट करण्यासाठी यूजरसना कॉन्टॅक्टलेस पेमेंट मशीनवर हे टायटन पे घड्याळ टॅप करून पेमेंट करता येइल. हे सध्या फक्त एसबीआय बँक कार्ड धारकांसाठीच कार्य करेल. ओटीपी शिवाय 2,000 पर्यन्त पेमेंट करता येईल, तर त्यापेक्षा जास्त पेमेंटसाठी ओटीपी प्रवेश करणे आवश्यक असेल.

कसे काम करेल हे घड्याळ?
SBI बँक कार्ड धारकांसाठी वॉच स्ट्रॅपमध्ये सुरक्षित नियर-फील्ड कम्युनिकेशन (NFC) चिप एम्बेड करून नवीन पेमेंट सिस्टम सादर केली गेली आहे. नवीन टायटन पे घड्याळ हे फक्त त्याच ठिकाणी काम करतील जिथे जिथे कॉन्टॅक्टलेस पीओएस मशीन उपलब्ध आहे.

Advertisement

काय असेल घड्याळाची किंमती?
टायटनने पुरुषांसाठी तीन घड्याळे लॉंच केली आहे ज्याची किंमत ₹2,995, ₹3,995 आणि ₹5,995 आहेत. प्रत्येक घड्याळाची डिझाईन प्रीमियम आहे. तसेच त्यात तारीख आणि दिवसासाठी अतिरिक्त डायल देखील आहे.

टायटनने महिलांसाठी देखील दोन घड्याळे लॉंच केली आहे ज्याची किंमत ₹3,895 आणि ₹4,395 आहे. जे तपकिरी आणि काळा लेदर पट्ट्यामध्ये दिसून येतात. ही सर्व घड्याळे टायटन इंडियाच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

Advertisement

काय आहे टायटनच्या व्यवस्थापकीय संचालक यांचे म्हणे?
“टायटन हे नेहमीच डिझाईन आणि नाविन्यपूर्णतेच्या शिखरावर होते. आम्ही आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा भागवण्यासाठी नेहमीच उत्पादने सुरू केली आहेत. वेगवान, सुरक्षित आणि निर्बाध अशा नवीन सामान्यसाठी पेमेंट सोल्यूशन सादर करण्यासाठी SBI परिपूर्ण भागीदार आहे.

हे उत्पादन केवळ ग्राहकांच्या बँकिंग गरजा भागवूच शकत नाही तर आजच्या विकसनशील ग्राहकांनाही आपल्या उत्कृष्ट आणि अत्याधुनिक डिझाईन्सची सेवा देईल”, असे टायटनचे व्यवस्थापकीय संचालक सी. के. वेंकटरमण यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here