ही महिला मातीशिवाय घराच्या छतावर फळे आणि भाज्या पिकवते, पिकवण्याची पद्धत बघून व्हाल थक्क

आपण कधी मातीशिवाय फळ आणि भाज्या पिकवत असल्याचे ऐकले आहे? आता आपण विचार कराल की हे कसे शक्य आहे? पण पुण्यातील नीला रेनावीकर ही महिला गेल्या 10 वर्षांपासून आपल्या घराच्या छतावर मातीशिवाय फळे आणि भाजीपाला पिकवत आहे.

नीला पेशाने अकाउंटंट आहे आणि मॅरेथॉन धावपटूही. नीलाने आपल्या घराच्या छतावरील एका 450 चौरस फूट क्षेत्राला अगदी शेता चा स्वपरुप दिलं आहे, जिथे त्या फळझाडे आणि फुलझाडा ची अनेक प्रकारे लागवड करते.

Advertisement

अशाप्रकारे फळे आणि भाज्या पिकवतात

फळे आणि भाजीपाला पिकवण्यासाठी निला कुंडीतील माती वापरत नाही. नीला रेनावीकर वाळलेली पाने, स्वयंपाकघरातील कचरा आणि शेणाच्या खता पासून कंपोस्ट तयार करतात आणि त्यामध्ये रोपं लावतात. कंपोस्टमधील पानांमुळे मातीशिवाय ओलावा बराच काळ राहतो, ज्यामुळे झाड निरोगी राहतात.

Advertisement

अशा वेळी, कंपोस्ट खता मुळे, गांडुळांसाठी एक चांगले वातावरण निर्माण होते, जे उत्पादन वाढविण्यास मोठ्या प्रमाणात मदत करते. नीलाच्या म्हणण्यानुसार या कामासाठी वेळ काढण्याची गरज आहे.

Image Source: Google Images

इंटरनेटची घेतली मदत

Advertisement

मातीशिवाय झाडे वाढवण्याचे हे तंत्र शिकण्यासाठी नीलाने इंटरनेट ची मदत घेतली. त्यांनी यूट्यूबवर विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यास सुरवात केली आणि झाडे वाढण्यापासून त्याचा सांभाळ करण्यापर्यंत काय काळजी घ्यावी हे शिकले. यानंतर त्यांनी त्याचा वापर सुरू केला.

नीलाने कंपोस्ट तयार करण्यासाठी एका डब्यात कोरडी पाने, शेण आणि किचन वेस्ट घालायला सुरवात केली. असे केल्याने कंपोस्ट फक्त एका महिन्यातच तयार झाले.

Advertisement

अशा प्रकारे सुरुवात केली

सुरुवातीला नीलाने बादलीमध्ये कंपोस्ट घालून काकडीच्या बिया पेरल्या. सुमारे 40 दिवसांनंतर, बादलीत दोन काकडी ची रोपं बाहेर आली. त्यानंतर नीला मिरची, टोमॅटो, बटाटे इत्यादी पिकवू लागल्या.

Advertisement

नीला रेनावीकर यांच्या मते मातीशिवाय लागवडीचे तीन मुख्य फायदे आहेत – प्रथम कीटक नाही, दुसरे कचरा किवां गवत नाही आणि तिसरे म्हणजे ही पद्धत मातीपेक्षा अधिक पोषक आहे.

Image Source: Google Images

फेसबुकवर शेती संबंधित टिप्स देतात

Advertisement

नीलाच्या बागेत 100 कॅन आहेत ज्यामध्ये त्या विविध प्रकारची फळे आणि भाज्या पिकवतात. त्यांच्या बागेतील फळे आणि भाज्या ते आपल्या मित्र मैत्रिणींना देखील वाटत असतात.

इतकेच नाही तर नीलाने आपल्या मित्रांसह फेसबुकवर ‘ऑरगॅनिक गार्डनिंग’ नावाचा एक ग्रुप तयार केला आहे, ज्यात सुमारे तीस हजार लोक शामिल झाले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून त्या सेंद्रिय शेती आणि बागकाम संबंधित टिप्स शेअर करतात.

Advertisement