ही महिला करतीये सॅलड विकून लाखोंची कमाई

Megha Bafna
Image Source: Facebook

हॉटेलमध्ये जेवण करताना, लोक नेहमी असा विचार करतात की सॅलड तर फ्री मधेच मिळेल. परंतु आजकाल सॅलडचे मूल्य वाढत आहे. सॅलड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बरेच लोक त्यांच्या आहारात विविध प्रकारचे सॅलड समाविष्ट करतात.

पुण्यातील एका महिलेने असाच सॅलडपासून एक चांगला व्यवसाय सुरु केला आहे. लोकांमध्ये सॅलडची चव पसरवण्या सोबतच त्यांनी सॅलडच्या धंद्यातून किती पैसे कमवता येतील हे देखील दाखवून दिले आहे.

Advertisement
Image Source: Facebook

वास्तविक पुण्यातील मेघा बाफना यांनी 2017 मध्ये हा व्यवसाय सुरू केला. ते त्यांच्या घरी सॅलड बनवायचे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते इतरांशी शेर करायचे. त्यांना हळू हळू ऑर्डरस येऊ लागल्या. मेघाला पहिल्याच दिवशी तिच्या मित्रांकडून 5 ऑर्डर मिळाल्या.

लोकांना मेघाचा सॅलड आवडू लागलं. ऑर्डर जसजश्या वाढत गेल्या तसतसा व्यवसाय देखील वाढत गेला.

Advertisement

आज मेघा एक बिझिनेस वूमन आहे. हा व्यवसाय त्यांनी केवळ 3,000 हजार रुपयांत सुरू केला. पण आजच्या काळात तिने सुमारे 22 लाख रूपयांपर्यंतची कमाई केली आहे.

Image Source: Facebook

मेघा रोज सकाळी साडेचार वाजता उठून सॅलडची पाकिटे तयार करायची. भाज्या आणायची, मसाले तयार करायची. तिने स्वत:च सर्व काही केले. अनेक वेळा तोटा सहन करूनही त्यांनी हा व्यवसाय काही सोडली नाही.

Advertisement

मेघाचा व्यवसाय आता पूर्णपणे व्यवस्थित स्थिर झाला आहे. लॉकडाउन पर्यंत तिचे जवळजवळ 200 नियमित ग्राहक होते. तिची दर महिन्याची बचत 75 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे. गेल्या चार वर्षांत तिने सुमारे 22 लाख रुपये कमावले आहेत.

ज्यांच्यात काहीतरी करून दाखवण्याची हिम्मत आहे त्यांना कधीही पराभूत केले जाऊ शकत नाही. ह्याचीच एक उत्तम उदाहरण म्हणजे मेघा आहे. व्यवसायात तोटा झाला तरीही तिने काही व्यवसाय सोडला नाही.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here