अन्न, वस्त्र आणि निवारा जश्या मूलभूत गरजा आहेत तसच सोशल मीडिया सध्याच्या पिढीची गरज ठरली आहे. खरं तर गरज कमी आणि जगण्याचा एक भाग झाला आहे. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम ही काही जगप्रसिद्ध सोशल मीडियाची माध्यम आहेत.
आपण आपले विचार, मतं यावर मांडतो. नवीन फोटो किंवा विडीओ लगेच शेअर करतो पण कधी मनात असा विचार आला का की या सर्वाची सुरूवात कशी झाली असेल?
आधीच्या काळात लोक एकमेकांशी संपर्क साधायला पत्र, तार, लॅण्डलाईन फोन, पेजर या सर्व गोष्टींचा वापर करायचे. परंतु १९९७ मध्ये सिक्स डिग्री’ज (Six Degree’s) नावाची पहिली साईट सोशल मीडियावर आली. या मध्ये लोकं स्वतःचे प्रोफाईल बनवून फ्रेंड्स बनवायचे.
१९९९ मध्ये सोशल मीडियाचा लक्ष वेधत एक ब्लॉगिंग साईट निर्माण झाली. या नंतर सोशल मीडियाची लोकप्रियता वाढत गेली. ‘माय स्पेस’, ‘लिंक्डइन’ यांना २० च्या दशकात प्रतिष्ठा मिळाली. त्या नंतर ‘फोटोबकेट’ आणि ‘फ्लिकर’ या दोन साईटनी लोकांना ‘ऑनलाईन फोटो शेअरींग’ ही सुविधा दिली.
२००५ मध्ये मार्क झकरबर्ग यांनी ‘फेसबुक’ चा शोध लावला. ह्या सोबत ‘ट्विटर’ चर्चेत आले आणि जगा वेगळा विक्रम घडला. या साईट्स अजूनही तेवढ्याच प्रसिद्ध आहेत हे वेगळे सांगायला नको.
इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, स्पॉटीफाय या आता सर्वात जास्त लोकांची पसंद बनत आहेत. सोशल मीडियाच्या मदतीने व्यवसाय देखील सुरू केले जातात. लोकं ह्याकडे लगेच आकर्षित होतात. सोशल मीडियाचा वापर जितका सावध होऊन करू तितका चांगला.
सुरक्षिततेच्या समस्या येऊ शकतात. एका क्लिक वर जसे आपण पैसे कमवू शकतो तसेच ते गमवू शकतो. सोशल मीडिया एक प्रकारचे मायाजाल आहे. जितके फायद्याचे तेवढेच हानिकारक आहे.