अश्मयुगीन पुणे
पुणे शहराचा जन्म निश्चित केव्हा झाला हे सांगणे फार कठीण आहे. सर्वांना आश्चर्य वाटेल पण साधारणपणे हजार एक वर्षांपूर्वी हे शहर अस्तित्वात आले.
पुण्यामधील संशोधनात काही दगडी, हत्यारे, भांडी, बरण्या, किटली प्रमाणे तोंड असलेली भांडी सापडली ही सर्व भांडी अश्म व ताम्र युगातील भांड्यांसारखीच आहेत. या युगात अशा भांड्यातुन मृत बालकांना पुरत असत. त्याचेच हे अवषेश असावेत. यावरूनच अश्म व ताम्र युगात पुण्यास मनुष्यवस्ती होती असे मानायला पुरेसा वाव आहे. मात्र हे अश्म व ताम्र युगातील लोक पुण्यात कोठुन आले हे मात्र सांगता येणे अवघड आहे.
आता ह्या अश्मयुगानंतर दुसऱ्या व तिसऱ्या शतकात महाराष्ट्रात बौध्द धर्माचा प्रसार वाढला होता कारण लेण्या कोरण्यासाठी आवश्यक असलेला पर्वत सह्याद्रिच्या रूपाने इथे उपलब्ध होता. साहजिकच बौद्धांचे लक्ष पुण्याकडे जाणे स्वाभाविक होते. पुण्यात फर्ग्युसन टेकडी जवळ अशा प्रकारची कोरलेली लेणी आढळतात यावरूनच पूर्वी येते काही बौद्ध भिक्षु रहात असावेत असा अंदाज आहे. तसेच बौद्धांच्या लेण्या सासवड व जुन्नर येथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळतात. या दोन बुद्धांच्या केंद्रांमध्ये दळणवळण होत होते ते पुणे मार्गे होत असावे असे वाटते.
या वरूनच पुण्यास हजार वर्षाचा इतिहास आहे हे सिद्ध होते.