मिरझापूर 2 ची प्रतिक्षा संपली – ‘या’ प्रसिद्ध कलाकाराची होणार सीझन 2 मध्ये एन्ट्री

Mirzapur 2
Image Source: Indianexpress

मिरझापूर या प्रसिद्ध वेब सीरिजच्या निर्मात्यांनी मिरजापूर 2 चा ट्रेलर रिलीज करुन देशभरातील लाखो चाहत्यांची प्रतीक्षा संपवली आहे. अॅमेझॉन प्राईम विडीओ वर प्रसारित झालेल्या या मिरझापूर सिझन २ च्या ट्रेलर मध्ये गुड्डू पंडित (अली फजल) मिरझापूर मिळवण्यासाठी कसा कलीन भैयाचा (पंकज त्रिपाठी) सूड घेतो हे दाखवले आहे.

ट्रेलरमध्ये मालिकेचे चार मुख्य पात्र – कलिन भैय्या, मुन्ना, गुड्डू, गोलू आणि इतर पात्र दिसले आहेत. यावेळी मुन्नाने मिर्झापूरच्या गादीवर बसण्याचा विचार केला आहे. त्याने एक नवीन नियम शोधला ज्यानुसार जो कोणी मिर्झापूरच्या गादीवर बसेल तो कधीही नियम बदलू शकतो.

Advertisement

मिरजापूरच्या सीझन 1 मध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू, श्वेता त्रिपाठी शर्मा, विक्रांत मेस्सी, श्रिया पिळगावकर, रसिका दुग्गल, हर्ष शेखर गौड, अमित सियाल, अंजुम शर्मा, शीबा चड्ढा, मनु ऋषि चढ्ढा आणि राजेश तैलंग हे मुख्य भूमिकेत होते. यावेळी मिर्जापूर 2 मध्ये विजय वर्मा, प्रियांशु पेंडौली आणि ईशा तलवार हे नवीन कलाकार दिसून येतील.

मिर्झापूर 2 चा ट्रेलरला चाहत्यांनी खूप पसंती दाखवली आहे. ट्रेलरच्या रिलीज झाल्यानंतर 18 मिनिटांतच 4,95,173 लोकांनी पाहिला. ट्रेलर येताच सोशल मीडियावर तो ट्रेंड बनला आहे.

Advertisement

ट्रेलर पहा:

मिरझापूर 2 चे निर्माते फरहान अख्तर, रितेश सिधवानी, कसीम जगमागिया, रुपाली सुरेश वैद्य आणि अब्बास रझा खान आहेत. मिरझापूर २ अॅमेझॉन प्राईम विडीओ वर 23 ऑक्टोबर २०२० पासून प्रसारित होईल.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here