सोशल मीडिया मध्ये किती ताकद आहे सर्वांनाच ठाऊक आहे! आणि संकटाच्या वेळी, हे बर्याच गरजू लोकांसाठी उपयोगी ठरले आहे. 80 वर्षीय गरीब कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ मध्ये अन्नाची विक्री न झाल्यमुळे ते रडताना दिसले.
मालविया नगर, दिल्ली मध्ये एक वयस्कर जोडपे ‘बाबा का ढाबा’ नावाचा छोटासा जेवणाचा स्टॉल चालवतात पण या कोरोना व्हायरसच्या काळात त्यांच्या अन्नाची विक्री कमी होत गेली. डाळ, भात आणि चपाती-भाजी सारखे घरगूती पदार्थ ते अगदी स्वस्त आणि परवडणाऱ्या भावात विकतात.
युट्युबर गौरव वासन त्यांच्या छोट्या दुकानात पोहोचला आणि त्याने विडीओ रेकॉर्ड केला ज्यात ते ८० वर्षीय बाबा संपूर्ण गोष्ट सांगताना रडले. ते १९८८ पासून हा छोटासा व्यवसाय करतात. येणाऱ्या दिवसात घर चालावं यासाठी ते जिद्दीने लढत आहेत.
विडीओ वायरल झाला आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी अनेक जनांच्या मनाला भावली. ट्विटर वर #बाबाकाढाबा ट्रेंडिंग टॉप आहे. दिल्लीतील लोक त्यांच्या दुकानात पोहोचून मदत करत आहेत. बाबांसोबत सेल्फी घेत आहेत.
आधी जे अन्न पडून राहायचे तेच आता संपू लागले आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड झाल्यावर ‘बाबा का धाबा’च्या बाहेर मोठी रांग लागल्यावर बाबा खूप झाले आणि त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटले.
रवीना टंडन, रणदीप हूडा, स्वरा भास्कर, निमरत कौर, गौरव वसन, रविचंद्रन अश्विन, सोनम कपूर, सुनील शेट्टी आणि अथिया शेट्टी हे सर्व या वृद्ध जोडप्यांला मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
बाबांसारखी अशी अनेक गरजू माणसं आहेत जी जगण्यासाठी मेहनत करत आहेत. जर आपल्याला शक्य असेल तर नक्कीच अश्या माणसांना मदत करावी ज्याने करून त्यांच्या चेहऱ्यावर परत हसू येईल आणि जगण्याची नवीन उम्मीद जागी होईल.
पूर्ण विडिओ बघा: