विंग कमांडर अभिनंदन यांच्या शौर्याची कथा – भारतीय वायु सेना दिवस विशेष

wing commander abhinandan varthaman
Image Source: Google Images

२७ फेब्रुवारी २०१९ रोजी लाईन ऑफ कंट्रोल वर भारत-पाकिस्तान चे हवाई युद्ध चालू असताना विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानाला शूट करून भारतीय वायू सेने मध्ये इतिहास रचला. विंग कमांडर खडकवासला येथे असलेल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) चे विद्यार्थी होते आणि १६ वर्ष लढाऊ पायलेट होते.

१४ फेब्रुवारी २०१९ पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यात ४० CRPF जवान मारले गेले आणि त्या नंतर भारत- पाकिस्तान मधील वाद वाढले. जैश-ए- मोहम्मदने आधारित दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

Advertisement

काही दिवसांनी भारतीय वायु सेनेने (आयएएफ) जैश-ए-मोहम्मदने चालवलेल्या दहशतवादी तळावर हवाई हल्ला केला. या हल्ल्या दरम्यान अभिनंदन वर्थमान यांनी R-73 मिसाईल पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानावर शूट केले. त्यानंतर दुर्दैवाने पाकिस्तानचे AMRAAM मिसाईल विंग कमांडर अभिनंदन यांच्या विमानाला लागले आणि त्यांना पाकिस्तानच्या सेनेने घेरले.

काही वेळाने पाकिस्तान मधून सोशल मीडियावर विंग कमांडर यांचे फोटो वायरल झाले ज्यात त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. थोड्याच वेळात एक विडीओ वायरल झाला ज्यात त्यांना पाकिस्तान कडून प्रश्न विचारले जात होते पण त्यांनी धाडसीपणे सांगितले की ते जास्त काही माहिती देऊ शकत नाहीत.

Advertisement

त्यांच्या या आत्मविश्वास आणि देशावर असलेल्या प्रेमामुळे त्यांनी सर्वांचे मन जिंकले. लगेच सोशल मीडियावर #bringbackabhinandan चा ट्रेंड चालू झाला.

दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी जाहीर केले की त्यांना अजून वाद वाढवायचे नाही आणि विंग कमांडर यांना सोडायला तयार आहेत. १ मार्च २०१९ रोजी विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना अटारी वाघाह बॉर्डर वर भारतीय अधिकार्‍यांकडे सोपवण्यात आले.

Advertisement

बालाकोट मध्ये दहशतवाद्यांच्या कॅम्प वर यशस्वी हल्ला केल्याबद्दल भारताचे एअर चीफ यांच्या हस्ते त्यांना वीर चक्र आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. विंग कमांडर अभिनंदन यांनी जिद्द आणि शौर्य दाखवून देशातील तरुणांसाठी प्रेरणा दिली आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here