जगातील सर्वात भीतीदायक महिला सिरियल किलर, जी कुमारी मुलींच्या रक्ताने स्नान करीत असे

Image Source: ripleys.com

इतिहासामध्ये अशा अनेक कथा आहेत, ज्या समोर आल्या की अंगावर काटा येतो. अशीच ही कथा आहे एका महाराणीची, जिच्या कारनाम्यान मुळे लोकांच्या मनात भीती पसरली होती. ही राणी एक भयानक सिरीयल किलर होती.

हंगेरीच्या ह्या राणीचे नाव एलिझाबेथ बाथरी असे होते. एलिझाबेथ बाथरी ही इतिहासातील सर्वात भीतीदायक आणि सिरियल किलर म्हणून ओळखली जाते. 1585 ते 1610 च्या दरम्यान राणी ने 600 पेक्षा जास्त मुलींची हत्या केली आणि त्यांच्या रक्ताने स्नान केले. असे म्हटले जाते की एका ज्योतिषाने एलिझाबेथला तिचे सौंदर्य टिकवण्यासाठी कुमारी मुलींच्या रक्ताने स्नान करण्याचा सल्ला दिला.

Advertisement
Image Source: historycollection.com

सीरियल किलर एलिझाबेथ मुलींची हत्या अगदी क्रूरतेने करायची. लोकप्रिय कथांनुसार, ती दाताने मृत मुलींचे मांस काढत असे. असेही म्हटले जाते की एलिझाबेथ बाथरीच्या या भयंकर गुन्ह्यात तिचे तीन नोकर पण शामिल होते.

खरं तर, एलिझाबेथ बाथरी हंगेरियन राजघराण्यातील होती. आपल्या तावडीत मुलींना अडकविण्यासाठी एलिझाबेथ जाळे रचत असे. मोठ्या राजघराण्यातील महिला असल्याने ती जवळच्या खेड्यातील गरीब मुलींना चांगल्या पैशान ची नोकरी चे आमिष दाखवून बोलावत असे. पण मुली राजवाड्यात येताच त्यांची शिकार केली जायची.

Advertisement
Image Source: thevintagenews.com

असे म्हटले जाते की जेव्हा परिसरातील गरीब मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली तेव्हा तिने उच्च कुटुंबातील मुलींची शिकार करण्यास सुरवात केली. जेव्हा हंगेरीच्या राजाला हे कळले तेव्हा त्याने या प्रकरणाची चौकशी केली. जेव्हा तपासक एलिझाबेथच्या राजवाड्यात पोहोचले तेव्हा तेथील परिस्थिती पाहून ते स्तब्ध झाले. तपास पथकाने एलिझाबेथच्या राजवाड्यातून अनेक मुलींचे सांगाडे व सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले.

1610 मध्ये, एलिझाबेथला तिच्या गुन्ह्यांसाठी अटक करण्यात आली. तिच्या गुन्ह्यांसाठी एलिझाबेथला फाशी देण्यात आली नाही, परंतु तिला स्वत:च्या राजवाड्यातील एका तुरूंगात टाकण्यात आले, तेथे तिचे 4 वर्षांनंतर 21 ऑगस्ट 1614 रोजी निधन झाले.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here