लेबनीजची राजधानी बेरूत स्फोटांनी हादरली, व्हिडिओ पहा

Beirut Explosion
Image Source: Google Images

मंगळवारी लेबनीजची राजधानी बेरूत येथे मोठ्या प्रमाणात झालेल्या स्फोटात अनेक लोक जखमी झाले आणि शहरातील इमारतींच्या खिडक्या उडाल्या.

बेरूत येथील बंदराजवळील फटाक्यांच्या गोदामात सुरुवातीला हा स्फोट झाला असावा असा अंदाज लेबनीजच्या एका नॅशनल न्यूज एजन्सीने दिला आहे.

Advertisement

या स्फोटामुळे मोठा शॉकवेव्ह निर्माण झाला आणि बंदरातून काही मैलांच्या अंतरावर इमारतींचे नुकसान झाले. यामध्ये माजी पंतप्रधान साद हरीरी यांचे मुख्यालय आणि बेरूत मधील सीएनएन च्या ब्युरोचे ही मोठे नुकसान झाले आहे.

स्फोटाच्या पार्श्वभूमीवर शहराभोवती लाल ढग दिसला असता अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटात मोठ्या संख्येने लोक जखमी झाले, असे तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

View this post on Instagram

IS EVERYONE SAFE?

Advertisement

A post shared by Widad Taleb (@widadstaleb) on

देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी त्या भागातील सर्व रुग्णालयांना जखमींना ताबडतोब भरती करून उपचार करण्याचे आदेश दिले आहे.

Advertisement

साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत दहा किलोमीटर पर्यंत असलेल्या घरांचे नुकसान झाले आहे. स्फोटस्थळापासून कित्येक किलोमीटर अंतरावर असलेल्या बेरूत येथील रहिवाशांनी सांगितले की स्फोटामुळे त्यांच्या खिडक्यांचा चुरा झाला आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here