वारसदार नव्या काळातील मनोरंजनाचे: The Heirs – Korean Drama

Image Source: Google

हेलो, कसे आहात? घरात राहताय ना ? हसताय ना? 

कसा जातोय तुमचा लॉकडाऊन ? टिव्ही वरच्या मालिका बंद झाल्या, चित्रपट पण आपले तेच नेहमीचे लागत आहेत. अर्थात नेटफ्लिक्स, हॉटस्टार असे बरेच पर्याय आहेत. हॉलीवूड, बॉलीवूड, साउथ इंडियन असे अनेक माध्यमाचे भाषांचे ‘कंटेंट’ आपण पाहतो. या सोबतच एक लोकप्रिय गोष्ट आहे ती म्हणजे कोरिअन ड्रामा. सुरुवाती पासूनच लोकप्रियता टिकवत, वेगवेगळे विषय हाताळत, नवनवीन गोष्टी ते आपल्या समोर आणतात. 

Advertisement

फक्त हिंदी गाण्यांवर, कोरिअन दृश्य एवढ्या पुरता मर्यादित असलेल्या गोष्टी, ‘Parasite’ चित्रपटाला ऑस्कर मिळाल्या नंतर चर्चेचा भाग बनला. 

तुमच्या कडे असणाऱ्या वेळात तुम्ही आणखी काय काय पाहू शकतात याबद्दल सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न. कोरिअन ड्रामा हा विषय घेऊन आपण पुढे जाऊया. लव्ह स्टोरीज हा तसा त्यांचा महत्वाचा भाग. युट्युब वर यातील बरेच उपलब्ध आहेत. 

Advertisement

असाच माझ्या पाहण्यात एक सुंदर ड्रामा आला.. ‘The Heirs’ ऑक्टोबर २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला.

मोठमोठ्या घराण्याच्या वारसदारांचे हे कथानक होते. कोरिया मध्ये राहणारे आणि ज्यांच्यावर कोरियाची अर्थव्यवस्था चालते, असे प्रचंड ताकदवान घराणे, त्यांचे अंतर्गत नाते संबंध, ताकद, सत्ता यासाठीचे राजकारण, त्यात जाणारा भावनांचा बळी, उच्चभ्रू वर्तुळाचे जगाला दिपवणारे रूप आणि अंतर्गत कोलाहल ह्या सगळ्या गोष्टी झाकून, वेगवेगळे चेहरे घेवून समोर येणारे लोक आणि हेच भवितव्य ठरवून दिलेले त्यांचे मुल, त्यांच्या कोमल भावना, आणि त्यातून फुलणारी एक सुंदर प्रेम कथा असा हा सगळा प्रवास होता.

Advertisement

इतका मोठा प्रवास फक्त २० भागांमध्ये, कुठेही उगाच टाकलेले-वाढवलेल्या गोष्टींशिवाय.

कथानक सुरु होते तेच मुळात एका सतत वेगवेगळे पार्ट टाईम काम करणाऱ्या मुली पासून ‘Cha Eun-Sang’ पासून. कॅफे, होम डिलिव्हरी, आणि अनेक छोटी मोठी काम करत हि मुलगी राहत असते, तिची आई हि बोलू शकत नसते, ती काम करत असते एका मोठ्या घराण्यातल्या स्त्री कडे. ह्या मुलीची बहिण शिक्षणाच्या नावाने अमेरिकेत गेलेली असते, जिच्यावर हीच प्रचंड प्रेम. तिचा एक मित्र असतो लहानपणा पासूनचा  Yoon Chan जो Jeguk Group ह्या मोठ्या बिसिनेस ग्रुप चा सेक्रेटरी चा मुलगा असतो. तो याच ग्रुप ची एक शाळा असते जिथे फक्त प्रतिष्ठीत घरातले मुल शिकत असतात. एक जे वारसदार आहेत घराण्यांचे, दुसरे जे या लोकांचे महत्वाचे शेअर होल्डर आहेत, तिसरे डॉक्टर, वकील, मोठे अधिकारी, राजकारणी यांची मुल आणि चौथा जो इथला सगळ्यात खालचा वर्ग असतो तो म्हणजे वरच्या तीन वर्गांचा मदतीने राहणारा, यांच्या साठी काम करणारा, जे सोशल केअर म्हणून इथे शिकत असतात. 

Advertisement

Yoon Chan, तिची बहिण यांचा Cha Eun-Sang ला फार हेवा वाटत असतो कारण ते चांगल्या परिस्थिती मध्ये शिक्षण घेत असतात, हुशार असूनही तिला हे शक्य होत नसते. बहिणीला पैसे देण्याच्या निमित्ताने आणि तिच्याशी संपर्क होत नसल्याने हि आई जवळचे पैसे घेवून अमेरिकेला जाते. तिकडे गेल्यावर हिला कळत कि आपली बहिण जे सांगते आणि परिस्थिती फार वेगळी आहे. त्यांच्यात भांडण होवून बहिण हिच्या जवळचे पैसे घेवून जाते. त्याच वेळी काही घडामोडींमुळे हिचा Kim Tan ह्या मुलाशी संपर्क येतो, तिला अडचणीतून बाहेर काढून तो तिची स्वतःचा घरी राहण्याची सोय करतो. त्याच वेळी घरच्यांनी जिच्याशी त्याच लग्न ठरवलेलं असते ती मुलगी त्याला भेटायला येते. या सर्व गोंधळात तो Cha Eun-Sang चा प्रेमात पडतो. अमेरिकेतून हि Yoon Chan चा मदतीने पुन्हा कोरियात येते. घर गेलेलं असत, आई आता मालकिणीच्या घरी राहत असते, हि पण राहायला जाते. हि मालकीण म्हणजेच Jeguk Group चा मालकाची प्रेयसी असते जिचा मुलगा असतो Kim Tan. काही कारणाने तो पण कोरियात परत येतो, त्याला कळत हि आपल्याच घरात काम करते, सोशल केअर ग्रुप मधून ती पण त्याच्याच शाळेत जायला लागते. तो आपल्या आईचा मालकाचा, एका मोठ्या घराण्याचा वारस आहे म्हणून ती त्याच्या बाबत भावना असून पण दूर राहण्याचा प्रयत्न करत असते, आणि तो सगळ्या विरोधाला पत्करून यात एक सुंदर संवाद होता. जेव्हा ती म्हणते कि ‘आपल्या दोघांचा एकाच घरातल्या दोन खोल्या म्हणजे दोन वेगळे जग आहेत, जी एकत्र आणायचा तू प्रयत्न करतोय ते कधीच शक्य नाही.’ 

त्याची सावत्र आई हीच त्यांचा शाळेची संचालक असते, आणि जगाच्या दृष्टीने याची आई, जगासमोर याची खरी आई तो पर्यंत नसते आलेली. त्याची आई पण एक खूप सुंदर पात्र आहे तुलनेने कमी वेळच पण खूप काही सांगून जाणारे. तो जेव्हा तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो, हा दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करतो त्या प्रत्येक गोष्टीत खूप अडचणी असतात. त्यांच्या शाळेची व्यवस्था, तिथे सोशल केअर वाल्यांना दिली जाणारी वागणूक, हि त्याचाच भाग आहे अशी तिची लपवून ठेवलेली ओळख. त्याचा लहानपणाचा मित्र जो एका हॉटेल च्या चेन चा मालकाचा मुलगा असतो जो आता याचा कट्टर विरोधक असतो, त्याचं अचानक बदलेल नात हा पण प्रवास ह्या वीस भागात महत्वाचा आहे. तो पण Cha Eun-Sang चा प्रेमात पडतो आणि नाट्य आणखी वळणे घेत. ह्या सोबतच अनेकांचे वेगवेगळ्या कारणांनी एकमेकांशी गुंतलेले हितसंबंध हा ह्या नात्याचा जबाबदार घटक वाटतो. हे सगळ समजून घेण्य साठी तुम्हाला ते प्रत्यक्ष पहावाच लागेल हे खर.

Advertisement

साम, दाम, दंड, भेद वापरून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करणारे त्याचे वडील, सत्ता आणि नाव असणारी सावत्र आई, जगासमोर अस्तित्वातही नसलेली- बोलण्याचा अधिकार नसलेली आई, आणि ज्याच्यावर याच खूप प्रेम असते पण याचा राग धरणारा मोठा भाऊ, शाळेतील मित्र, त्याचे लग्न जिच्या सोबत ठरले ती आणि तिची आई, बोलता न येणारी पण हुशार अशी Cha Eun-Sang ची आई ह्या पात्रांभोवती हे सारे कथानक फिरते.

प्रेम, भांडण, आपले दिसणारे पण स्वतःच्या हितसंबंधासाठी दुरावणारे लोक, सत्तेचे, पैस्याचे राजकारण आणि यातून वेगळ राहून सामान्य पणे जगण्याची अपेक्षा करणारे, सोबत जगण्याच स्वप्न पाहणारे Cha Eun-Sang आणि Kim Tan.

Advertisement

कोरिअन च नव्हे तर चायनीज, थाई, जापनीज सिरीज पण आपला ठसा उमटवत आहेत. या सगळ्या गोष्टी पाहताना एक बाब जास्त प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही जा नाती आणि त्यातल्या अपेक्षा सगळ्या ठिकाणी सारख्या आहे. त्यातून निर्माण होणारे प्रश्न आणि त्यात गुंतलेले भावनिक बंध हा खरा जुनाच पण प्रत्येकदा नव्याने मांडला जाणारा विषय. पहिल्या काही वेळा जेव्हा आशियाई ड्रामा पहिले तेव्हा त्याचं वेगळेपण, चकचकीत पण, त्याचा अभ्यास ह्या गोष्टी सहज नजरेत भरत आता त्यांचे आणि आपल्यात सीमांच्या पार जाऊन आणखी काय साम्य आहे ते खुणावते. तुम्ही पण पहा, कसे वाटतात नक्की कळवा आणि हो घरातच राहा, सुरक्षित राहा.

*आपण हि series Netflix वर बघू शकता*

लेख आवडल्यास नक्की शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. तुमच्या कडे जर interesting लेख असतील तर आम्हाला [email protected] या इमेल आयडीवर पाठवा.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here