‘पुण्यातील पहिली चिमणी’

first chimney in Pune
Image Source: Google Images

पुण्यात स्टेशनजवळ राजा बहादूर मिल ही एकमेव कापडाची मोठी गिरणी होती. सन १८९३ साली ही गिरणी चालू झाली. ही गिरणी स्टेशनजवळ चालू करण्याची दोन प्रमुख कारणे म्हणजे मालाची ने आण करण्यासाठी स्टेशनजवळ व पाणी पुरवठ्यासाठी नदी समीपच होती. त्यावेळी केसरी मध्ये लोकमान्य टिळकांनी ‘पुण्यातील पहिली चिमणी’ म्हणुन विस्तृत अग्रलेख लिहीला होता.

पुण्यास ही गिरणी झाली त्यावेळी आपल्या देशात खपणाऱ्या धोतर जोड्या, लुगडी यासारखा माल तयार करण्याची कल्पना होती. तसेच खण, पितांबर, करवती यांचेही उत्पादन करावे असा त्यांचा इरादा होता. त्यानंतर प्रारंभी या गिरणीतुन हे उत्पादन झाले. पण पुढे काळाबरोबर या गिरणीची म्हणावी अशी वाढ झाली नाही. पहिल्या महायुद्धाच्या काळात देखील ती फारशी प्रगती करू शकली नाही.

Advertisement

पुढे सन. १९३४ साली या गिरणीला आग लागली व जवळ जवळ सर्वच स्पिनिंग खाते भस्मसात झाले. त्यानंतर १९३५ मध्ये गिरणी पुन्हा चालू झाली. त्यावेळी गिरणी मध्ये दिवसपाळी व रात्रपाळी मिळून एकूण १४०० कामगार काम करीत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात देखील गिरणी च्या उत्पादनात फारशी वाढ झाली नाही.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here