T20 WC: बुर्ज खलीफावर दिसली टीम इंडियाच्या नव्या जर्सीची झलक; पाहा व्हिडिओटी २० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं. टीम इंडिया १८ ऑक्टोबरला आपला पहिला सराव सामना खेळणार आहे. या दिवशी टीम इंडिया नव्या जर्सीत दिसणार आहे. टी २० विश्वचषकाला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. २४ ऑक्टोबरला दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आहे. तत्पूर्वी टीम इंडियाच्या नव्या जर्सीचं अनोख्या अंदाजात स्वागत झालं. दुबईच्या बुर्ज खलीफा इमारतीवर टीम इंडियाची नवी जर्सी दिसली. खेळाडूंच्या छायाचित्रांनी जगातील सर्वात उंच इमारत झळालून निघाली.

Advertisement

बीसीसीआयने ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात बुर्ज खलीफा इमारतीवर टीम इंडियाच्या नव्या जर्सीची झलक दिसत आहे. टीम इंडियाच्या जर्सीची “बिलियन चीअर्स जर्सी” अशी टॅगलाइन आहे.

टीम इंडियाने २००७ पासून टी-२० वर्ल्डकप जिंकलेला नाही. दुसरीकडे पाच वेळा वनडे वर्ल्डकप जेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. स्पर्धेचा हा सातवा हंगाम असून वेस्ट इंडिज स्पर्धेचा गतविजेता आहे आणि त्याने दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड हे देखील प्रत्येकी एकदा विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाले आहेत. दुसरीकडे आयसीसीने विजेत्या संघाला १.६ दशलक्ष डॉलर्स (जवळपास १२ कोटी), तर उपविजेत्या संघाला ८,००,००० डॉलर्स म्हणजेच ६ कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर स्पर्धेतील १६ स्पर्धक संघांना ५.६ दशलक्ष डॉलर्सचा बक्षीस म्हणून वाटा मिळेल. १० आणि ११ नोव्हेंबरला होणाऱ्या उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ४,००,००० डॉलर्स म्हणजेत ३ कोटी रुपये मिळणार आहेत.

The post T20 WC: बुर्ज खलीफावर दिसली टीम इंडियाच्या नव्या जर्सीची झलक; पाहा व्हिडिओ appeared first on Loksatta.

Advertisement

Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here