“जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफने रविवारी पोलिसांना १५० मीटर लांबीच्या भूमिगत बोगद्याचा शोध लागला ज्याचा वापर जैश-ए-मोहम्मदच्या (जेईएम) ४ दहशतवाद्यांनी घुसखोरीसाठी केल्याचा संशय अाहे.” असे राज्याचे पोलिस प्रमुख दिलबाग सिंह यांनी सांगितले.
सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) अधिकारी एन.एस जामवाल आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी मुकेश सिंह यांनी रेगल चौकीजवळ घटनास्थळाची पाहणी केली.
सिंह यांनी सांगितले की, “जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील नगरोटाजवळ नुकत्याच झालेल्या चकमकीचा तपास करत असताना बोगद्याचा शोध लागला.
“गुरुवारी महामार्गावरील बॅन टोल प्लाझा येथे तपासणीसाठी थांबलेल्या ट्रकमध्ये काश्मीरला जाणारे चार पाकिस्तानी दहशतवादी चकमकीत ठार झाले. दहशतवाद्यांकडून ११ एके असॉल्ट रायफल्स, ३ पिस्तुल, २९ ग्रेनेड आणि ६ यूबीजीएल ग्रेनेड्स आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
मागील तीन महिन्यांत सांबा येथे आयबीच्या बाजूने बीएसएफने शोधलेला हा दुसरा बोगदा आहे. ऑगस्टमध्ये सीमा रक्षक दलाला गॅलार भागात सीमा कुंपणाजवळ बोगदा दिसला होता.
जामवाल म्हणाले २.५ मीटर रूंद व २५ ते ३० मीटर खोल बोगद्याचे काम योग्य अभियांत्रिकी प्रयत्नातून केले गेले आहे. पोलिस व गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या सहकार्याची आणि नियमित माहितीचे त्यांनी कौतुक केले आणि त्यामुळे बोगदा लवकर शोधण्यात यश आले.