Strawberry Moon 2022 : 14 जून म्हणजेच काल वटपौर्णिमेला आकाशात एक खास नजारा पाहायला मिळाला. पौर्णिमेच्या दिवशी दिसणार्या या चंद्राला स्ट्रॉबेरी सुपरमून म्हणतात. या सुपर मूनला हनी मून असेही म्हटले जाते. काल संध्याकाळी हा चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ होता, त्यामुळे तो इतर दिवसांपेक्षा खूप मोठा दिसत होता. मंगळवारी चंद्र पृथ्वीपासून 222,238 मैलांच्या आत आला. सलग चार सुपरमूनपैकी हा दुसरा सुपरमून होता. या चंद्राचे फोटो व्हायरल होत आहेत. पाहा याचा झालक. लोक सोशल मीडियावर चंद्राचे फोटो शेअर करत आहेत आणि त्याच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. येथे काही चित्रे पाहा:
FULL STRAWBERRY MOON
AdvertisementLOOK: Photographers captured the spectacular appearance of tonight’s full “Strawberry Supermoon,” as seen from their locations on Tuesday, June 14.
: See each photo for proper credits | @vesgarcia_ #BeAnINQUIRER pic.twitter.com/LhjeSu0CA1
Advertisement
— Be An INQUIRER (@BeAnINQUIRER) June 14, 2022
..म्हणूनच याला स्ट्रॉबेरी मून म्हणतात
जून महिन्याच्या पौर्णिमेला स्ट्रॉबेरी मून हे नाव अमेरिकेतील आदिवासी जमातींनी दिले आहे. एका रिपोर्टनुसार, हे नाव अल्गोनक्विन, ओजिब्वे, डकोटा आणि लकोटा लोक वापरत आहेत. आपल्या देशात याला पौर्णिमा म्हणतात, पण पाश्चात्य देशांसाठी हा स्ट्रॉबेरी मून आहे.
#strawberrymoon #Sagittarius #SaturninRetrograde #moonlightdrive June 14 2022
At the end of your night, try to clear release old energies that are not serving you. This moon is for prosperity & manifesting. What are you drawing in? #gratitude #healing #goodkarma #goodenergies pic.twitter.com/QwebOwJAVvAdvertisement
— ॐ Tomorrow Never Knows ॐ (@CosmicDustAra) June 14, 2022
दुर्मिळ सुपरमून
नासाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा सुपरमून त्याच्या कक्षेत पृथ्वीपासून सर्वात जवळ असतो, तेव्हा तो नेहमी दिसणाऱ्या चंद्रापेक्षा 17 टक्क्यांनी मोठा आणि 30 टक्के जास्त उजळ दिसतो. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार हे सुपरमून दुर्मिळ आहेत, वर्षातून तीन ते चार वेळा येतात. खगोलशास्त्रात रस असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचं यूएस स्पेस एजन्सीने म्हटलं आहे. या काळात लोक दुर्बिणीचा वापर करून चंद्राच्या पृष्ठभागावरील खड्डे आणि डोंगर पाहू शकले. ही पौर्णिमा ऑनलाइनही थेट पाहता आली. मिळालेल्या माहितीनुसार, इटलीतील सेकानो येथील व्हर्च्युअल टेलिस्कोप प्रोजेक्टद्वारे पौर्णिमेचे मोफत लाइव्ह स्ट्रीम केले. भारतीय वेळेनुसार ते रात्री 12.45 मिनिटांनी सुरू झाले
AdvertisementFull moon in Mumbai ! Sending positive to everyone #FullMoon #SailorMoon #StrawberryMoon #TheMoon #ASTRO pic.twitter.com/xvoFE9K1v5
— Kevin (@iamkevins) June 14, 2022Advertisement