श्रीलंका २ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करणार आहे. कोविड -१९ पार्श्वभूमीवर उड्डाणांचे कामकाज बंद झाले.
या संदर्भात श्रीलंकेच्या नागरी विमान प्राधिकरणाने (सीएएएसएल) सांगितले की “ते ट्रॅव्हल इंडस्ट्रीला चार्टर फ्लाइट्स आणि कमर्शियल फ्लाइट ऑपरेशन्ससाठी श्रीलंकेचे हवाई क्षेत्र उघडण्यासंदर्भात ट्रॅव्हल इंडस्ट्रीला निर्देश देणार आहेत.”
श्रीलंकेची दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्चच्या मध्यापासून बंद झाली आहेत.
मे महिन्याच्या अखेरीस देशाने हळूहळू निर्बंध हटविणे सुरू केले. ऑगस्टच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवण्याची योजना आखण्यात आली असली तरी, इतर देशांमध्ये कोविड ची वाढ झाली असून त्यामुळे या योजना आणखी रखडल्या आहेत.
श्रीलंकेला ऑक्टोबरमध्ये कोरोनाव्हायरसच्या दुसर्या लाटेचा तडाखा बसला होता. यापूर्वी श्रीलंका सरकारने गमपहा जिल्ह्यातील वस्त्र उत्पादन केंद्रामध्ये कोव्हीड -१९ केस सापडल्यानंतर सर्व उड्डाणेही पुढे ढकलली.
आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू झाल्यावर सुरक्षेच्या सर्व उपाययोजनांसह श्रीलंका लवकरच परदेशी पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.