भोसले घराण्याने कधीपासून पुण्यावर सत्ता गाजवली? जाणून घ्या

भोसले घराणे आणि पुणे
Image Source: Google Images

भोसले घराणे आणि पुणे

१६ व्या शतकाच्या उत्तरार्धात भोसले घराण्याने पुण्यावर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास सुरवात केली. मालोजी भोसले मनसबदारीच्या सामान्य हुद्द्यावर असताना कर्तृत्वाच्या जोरावर १५९५ ला अहम्मदनगरच्या निजामाकडून जहागिरी मिळवली.

Advertisement

परंतु, इ.स. १६०० ला दिल्लीपती मोगल बादशहा अकबर याने अहम्मदनगरची निजामशाही ताब्यात घेतली. साहजिकच पुणे सुद्धा दिल्लीच्या बादशहा कडे गेले. पण अवघ्या २० वर्षा नंतर मलिकंबराने मोगलांकडुन शौर्याने अहम्मदनगरचे राज्य मिळविले व पुणे भाग या राज्याला जोडला गेला.

१६२१ ला मलिकंबर निजामशाहीची धुरा वाहत होता. शहाजीराजे मालिकांबरचे विश्वासू सेनापती असल्याने पुणे व शिरवळ परगण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. पण पुढे मलिकांबर आणि शहाजीराजांचे बिनसल्याने शहाजीराजांनी पुणे व शिरवळ वर आपले स्वतंत्र राज्य सुरु केले.

Advertisement

मलिकंबरने सैन्य पाठवून शहाजीराजांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. पण शहाजीराजे लागलीच आदीलशाहीला जाऊन मिळाले. तीन ते चार वर्षे शहाजीराजे आदीलशाहीत होते.

पुढे दिल्लीच्या बाद्धशाहीशी मुकाबला करण्यासाठी निजामशाहीस शहाजीराजांसारख्या सेनापतीची गरज होती, निजामशाहीच्या विनंतीस मान देऊन शहाजीराजे निजामशाहीत आले. ओघाने पुणे प्रांतही निजामशाहीत आला.

Advertisement

परंतु, इ.स. १६३० साली निजामाने शहाजीराजांचे सासरे लखुजी जाधव यांचा विश्वासघाताने खुन केला. त्याचा निषेध म्हणुन शहाजींनी निजामशाहीस
रामराम ठोकला आणि आदिलशहा व निजामशहा यांच्या प्रांतात बंड पुकारले.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here