KGF 2 चे शूटिंग पुन्हा झाले सुरू

KGF 2
Image Source: Google Images

‘केजीएफ’ ची कहाणी भारताच्या १९८० च्या दशकात घेऊन जाते. सत्ता आणि संपत्तीच्या शोधात एका अनाथ मुलाचा प्रवास यात दाखवला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आणि तसच चाहते ‘केजीएफ’ – २ रिलीज होण्याची वाट पाहत आहेत.

या चित्रपटाचा मुख्य अभिनेता यशने गुरुवारी त्याचा इंस्टाग्राम अकाउंट वर स्वतःचा एक फोटो शेअर करत सांगितले की त्याने केजीएफ-२ चे शूटिंग पुन्हा सुरू केले आहे.

Advertisement

कोविड -१९ च्या लॉकडाउन मध्ये केजीएफ -२ चे शूटिंग ठप्प झाले होते. सरकार ने शूटिंगवरील बंदी कमी केल्यावर लवकरच दिग्दर्शक प्रसंथ नील यांनी चित्रपटाचे शूट पुन्हा सुरू केले.

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात, चित्रपट निर्मात्यांनी अभिनेता प्रकाश राज आणि मालविका यांच्याबरोबर शूटच्या अंतिम भागाला सुरुवात केली होती. पहिल्या भागात कथनकारची भूमिका साकारणारे अभिनेते अनंत नाग यांची जागा प्रकाश राज घेणार अशी शक्यता वर्तवली जात होती.

Advertisement

तथापि, चित्रपट निर्मात्यांनी या अफवांना नकार दिला आहे. असं म्हटलं जात आहे की दिग्दर्शक प्रसंथ हे शूट एका महिन्यापेक्षा कमी वेळात संपवून त्याच्या पोस्ट-प्रॉडक्शनवर काम सुरू करणार आहे.

क्लायमॅक्सचा भाग मात्र बॉलिवूड स्टार संजय दत्तच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. सध्या तो कॅन्सरच्या संकटाला तोंड देत असल्याचे दिसते. केजीएफ-२ मधील मुख्य खलनायक अधिराच्या भूमिकेसाठी बॉलिवूडमध्ये चांगला अनुभव असलेल्या संजय दत्तला निवडले आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here