शिवसेना@५४

Image Source: Google

‘आवाऽऽऽज कुणाचाऽऽऽ’ अशी दमदार साद येताच तितक्याच दमदारपणे ‘शिऽऽऽव सेनेचाऽऽऽ!’ हा प्रतिसाद हजारो मुखांतून ज्या संघटनेसाठी येतो, त्या शिवसेनेचा आज ५४वा वर्धापन दिन!

एका व्यंगचित्रकाराने (बाळासाहेब ठाकरे) झुंजार व लढाऊ राजकीय-सामाजिक संघटनेची स्थापना करून तिला वर्धीष्णु चंद्राप्रमाणे सतत वाढतच ठेवली, असे उदाहरण जगात दुसरे नाही.

Advertisement

‘मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी’ लढण्याकरता स्थापन झालेली ही मुंबईची संघटना नागमोडी वळणे घेत व अनेक अवघड घाट पार करत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत आता पोहोचली आहे. दरम्यान संघटनेचा ‘राजकीय पक्ष’ झाला व नेतृत्व बाळासाहेब ठाकरेंकडून त्यांचे धाकटे चिरंजीव उद्धव ठाकरे यांच्याकडे आले व आता त्यांचे चिरंजीव आदित्य आमदार व मंत्रीही झाले.

शिवसेनेचा हा प्रवास विस्मयचकित करणारा आहे. मराठी माणसाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी जन्माला आलेल्या शिवसेनेने पुढे कम्युनिस्टांविरुद्ध मोहीमा चालवून तो पक्ष मुंबईत जवळपास संपवला. नंतर सेनेने हिंदुत्वाचा झेंड्यात हाती घेतला. त्याचा राजकीय फायदाही मिळाला.

Advertisement

बाळासाहेब मुळात ‘साहसवादी’ असल्याने बदलत्या पिढ्यांतील नवनवे तरूण कायमच त्यांच्या पाठीशी राहिले. १९९५मध्ये सेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, तेव्हा सरकारचा ‘रिमोट कंट्रोल’ माझ्याच हातात आहे, असे बिनदिक्कत जाहीर करून त्यांनी कारभाराची ‘पद्धत’ जाहीर करून टाकली.

बाळासाहेबांच्या ढासळत्या प्रकृतीमुळे पक्षाचा काभार उद्धवजींकडे आला, तेव्हा त्यांनी सेनेची ‘मानसिकता’ बदलली. ‘राडा’ संस्कृतीतून. शिवसेना बदलली. हा बदल काहींना रुचला, पटला नाही पण ती काळाची गरज होती, हे मात्र खरं!

Advertisement

त्यानंतरचा गेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत व त्यानंतरचा इतिहास तर सर्वज्ञात आहे. निवडणुकीनंतर शिवसेनेने अचानक फाटा बदलला व २७ वर्षांची भाजपची साथ सोडून आतापर्यंत ‘शत्रू’ असलेल्या काॅंग्रेस व राष्ट्रवादीच्या साह्याने सरकार बनवले व स्वत: उद्धवजी मुख्यमंत्री व आदित्य मंत्री बनले.

आता ५४ वर्षांनंतर शिवसेनेचा प्रवास वेगळ्या मार्गाने सुरू झाला आहे. हा रस्ता शिवसेना नेतृत्व व कार्यकर्त्यांच्या परिचयाचा नाही. त्यावरून पहिल्या वर्षांत कसा प्रवास होतो, त्यांवर शिवसेनेच्या पुढच्या वाटचालीचे भवितव्य ठरेल.

Advertisement

या प्रवासासाठी शिवसेना व उद्धवजींना आणि लाखो शिवसैनिकांना शुभेच्छा !

सदर लेख हा पत्रकार भारतकुमार राऊत ह्यांच्या फेसबुक पोस्ट वरून घेतलेला आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here