Samsung आणि Viv0 ने भारतात लॉन्च केले नवीन स्मार्टफोन, जाणून घ्या माबाईलची किंमत आणि फीचर्स !


Advertisement

Samsung galaxy s21FE, Vivo Y33T Features : सॅमसंग यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. सॅमसंगने भारतात नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन Samsung Galaxy S21 FE आहे. या मोबाईलमध्ये Exynos 2100 सिलीकॉन प्रोसेसर दिले गेले आहे. मोबाईलमध्ये 8 जीबी रॅमबरोबरच 128 जीबी इंटर्नल मेमरी दिलेली आहे तर दुसऱ्या व्हेरियंटमध्ये 8 जीबी रॅमबरोबर 256 जीबी इंटर्नल मेमरी दिलेली आहे. एवढेच नाही तर या मोबाईलमध्ये 6.4 इंचाचा डिस्पेदेखील आहे. 

या मोबाईलच्या कॅमेऱ्याची गोष्ट केल्यास मोबाईलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 12 मेगापिक्सलचा, टेलिफोटो लेन्स 8 मेगापिक्सलचा आणि अल्ट्रा व्हाईड अॅंगलची लेन्स 12 मेगापिक्सलची आहे. तर सेल्फीसाठी यामध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. मोबाईलला पावर देण्यासाठी यामध्ये 4500mAhची बॅटरी दिलेली आहे जी 25 व्हॅट चार्जरसह फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देते. याच्या 128 जीबी रॅम व्हेरियंटची किंमत 49,999 रुपये आणि 256 जीबी व्हेरियंटची किंमत 53,999 रुपये आहे. 

Advertisement

Vivo Y33T चे फीचर्स :

Vivo ने आपला नवीन स्मार्टफोन Vivo Y33T लॉन्च केला आहे. या मोबाईलमध्ये 6.58 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिलेला आहे. या मोबाईलचा परफॉर्मन्स चांगला राहावा यासाठी यामध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल मेमरी दिली आहे. हा मोबाईल काळ्या आणि मिडी ड्रीम कलरमध्ये उपलब्ध आहे. फोटोग्राफीच्या दृष्टीने यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे आणि दूसरे दोन कॅमेरे 2-2 मेगापिक्सलचे आहेत. यामध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरादेखील दिलेला आहे. 

Advertisement

आजच्या काळात कोणत्याही बाबतीत सुरक्षा महत्वाची आहे. याकरता या मोबाईलमध्ये बाजूला फिंगरप्रिंट स्कॅनरसुद्धा दिलेले आहे. मोबाईलच्या पावर बॅकअपसाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी दिलेली आहे. या मोबाईलची किंमत 18,990 रुपये आहे. 

हे ही वाचा :

Advertisement

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

[yt]

Advertisement

[/yt]Source link

Advertisement