RR vs SRH : राजस्थानचा ‘खेळ’ बिघडवण्यासाठी हैदराबाद सज्ज; संजू सॅमसननं जिंकला टॉसआयपीएल २०२१मध्ये आज हंगामातील ४०वा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या लीगमध्ये केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या संघाने आतापर्यंत खेळलेल्या ९ पैकी फक्त एक सामना जिंकला आहे आणि ते गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहेत. राजस्थानबद्दल बोलायचे झाले तर हा संघ ९ पैकी ४ सामने जिंकत ८ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे राजस्थानचा प्लेऑफच्या शर्यतीसाठीचा खेळ बिघडवण्यासाठी हैदराबाद सज्ज झाला आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सचा इतिहास पाहिला तर दोन्ही संघ बरोबरीच्या स्थितीत दिसतात. आयपीएलमध्ये दोन्ही फ्रेंचायझी एकूण १४ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी सात वेळा विजय मिळवला आहे. जो संघ हा सामना जिंकेल त्याला नक्कीच आघाडी मिळेल.

दोन्ही संघ

Advertisement

राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कप्तान), लियाम लिव्हिंगस्टोन, एविन लुईस, डेव्हिड मिलर, ख्रिस मारिस, ओशाने थॉमस, मुस्तफिझूर रहमान, तबरेज शम्सी, ग्लेन फिलिप्स, चेतन साकारिया, रियान पराग, राहुल तेवतिया, आकाश सिंह, अनुज रावत, केसी करियप्पा, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट, महिपाल लोमरोर.

सनरायझर्स हैदराबाद: केन विल्यमसन (कप्तान), डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, वृद्धीमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, राशिद खान, विजय शंकर, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी. नटराजन, बेसिल थम्पी, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, अब्दुल समद, जे सुचित, जेसन होल्डर, विराट सिंग, प्रियम गर्ग, केदार जाधव, मुजीब-उर-रहमान, जेसन रॉय.

Advertisement

The post RR vs SRH : राजस्थानचा ‘खेळ’ बिघडवण्यासाठी हैदराबाद सज्ज; संजू सॅमसननं जिंकला टॉस appeared first on Loksatta.Source link

Advertisement