राजस्थान मध्ये होणार डिजिटल कोविड रिलिफ कॉन्सर्ट सिरीज

Image Source : Google Images

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी कलाकारांना पाठिंबा देण्यासाठी डिजिटल कोविड रिलिफ कॉन्सर्ट सीरिज, पधारो म्हारे देस सुरू केली आहे. ह्या उपक्रमाची जबाबदारी राजस्थानातील गायिका मनेषा अग्रवाल यांच्या अर्पण फाऊंडेशनने घेतला आहे.

मनीषा राम आणि ग्रूप – जैसलमेरच्या मेघवालांसह ; बुंडू खान आणि बँड – लंगस ऑफ जोधपूर; दापू खान मिरासी; सुगनी देवी – सेंसेशन ऑफ कलबेलिया – जोधपूर; चाणू मामा प्रोजेक्टचे थानू खान आणि तारिफ खान; मेहबूब खान लंगा आणि इतर कलाकार मैफिली मध्ये नामांकित कलाकार भाग घेतील.

Advertisement

मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन करताना सांगितले की लोककला करणारे कलाकार रोजीरोटीसाठी केवळ त्यांच्या कलेवर अवलंबून असल्याने कोरोनाव्हायरस संकटाच्या वेळी अशा लोक कलाकारांना आधार देण्यासाठी ही अनोखी संकल्पना महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

दरम्यान, सर्वाधिक कोरोनाव्हायरस बाधित आठ ठिकाणी रात्रीचे कर्फ्यू लागू करण्यात आले ज्यात बीकानेर, जोधपूर, कोटा, जयपूर, भिलवाडा, अजमेर, अलवार आणि भिलवारा या भागांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी फेस मास्क न घातलेल्यांना ५०० रुपये दंडही लावला आहे.

Advertisement

या वृत्तानुसार पधारो म्हारे देस मध्ये जैसलमेर, जोधपूर आणि बारमेरमधील जवळपास ७० लोक कलाकार असणार आहेत.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here