Pro Kabaddi League 2021 : हरियाणा स्टीलर्सची गुजरात जायंट्सवर निसटता विजय


गुजरातच्या राकेशने एकूण १९ गुण घेतले मात्र त्याचा संघ विजयी होऊ शकला नाही.

Advertisement

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील २८ व्या सामन्यात आज हरियाणा स्टीलर्सने गुजरात जायंट्सचा ३८-३६ असा पराभव केला. एका टप्प्यावर १४ गुणांनी पिछाडीवर पडल्यानंतर गुजरातने आघाडी घेत गुणांमधील फरक कमी केला. अखेर हरियाणाने ही लढत दोन गुणांनी जिंकली.

आजच्या सलामीच्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने गुजरात जायंट्सवर ३८-३६ असा निसटता विजय नोंदवला. गुजरातच्या राकेशने एकूण १९ गुण घेतले. हरियाणाच्या विकास कंडोलाने ११ गुण घेत आपल्या संघाला दोन गुणांनी विजय मिळवून दिला. हरियाणाची अष्टपैलू खेळाडू मीतूनेही सुपर टेन पूर्ण केला.

Advertisement

आता २९व्या सामन्यात बेंगळुरू बुल्सचा सामना पुणेरी पलटणशी होत आहे. यंदाच्या हंगामात पुणेरी पलटणला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. दोन्ही संघांच्या मोहिमेची सुरुवात पराभवाने झाली पण त्यानंतर बेंगळुरू बुल्सने आपल्या चुका सुधारत विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Advertisement

Source link

Advertisement