Pro Kabaddi League : हरियाणा स्टीलर्स आणि यू मुंबा यांच्यातील अटीतटीची लढत अखेर बरोबरीतच सुटली


यू मुंबाचा या हंगामातील हा तिसरा सामना आहे जो बरोबरीत आहे.

Advertisement

प्रो कबड्डी लीग २०२१-२२ च्या १४ व्या दिवशी म्हणजे आज दोन सामने खेळवले जात आहेत. या पैकी पहिला सामना हा हरियाणा स्टीलर्स आणि यू मुंबा यांच्यात झाला. अतिशय अटीतटीचा झालेला हा सामना अखेर बरोबरीतच सुटला. हरियाणा स्टीलर्स आणि यू मुंबा यांनी २४-२४ असे समान गुण मिळवले. यू मुंबाचा या हंगामातील हा तिसरा सामना आहे जो बरोबरीत आहे.

सहा मिनिटांचा खेळ बाकी होता तेव्हा यू मुंबाने प्रथम हरियाणाची आघाडी संपुष्टात आणली होती. यानंतर शानदार खेळ दाखवत २ गुणांची आघाडीही घेतली होती.

Advertisement

तर, आजच्या दुसऱ्या सामान्यात यूपी योद्धा आणि तमिळ थलायवास हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

या हंगामासाठी एकूण १२ संघ मैदानात उतरलेले आहेत. गेल्या वर्षी करोना महामारीमुळे ही लीग आयोजित करता आली नव्हती. अशा परिस्थितीत चाहते या रोमांचक लीगची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते.

Advertisement

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Source link

Advertisement