Pro Kabaddi League : तमिळ थलायवाजनं हरयाणाच्या आक्रमणाला रोखलं; ४५-२६ असा उडवला धुव्वा!बंगळुरू येथे सोमवारी झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या ४५व्या सामन्यात तमिळ थलायवाजने हरयाणा स्टीलर्सचा ४५-२६ असा धुव्वा उडवला. या सामन्याच्या पहिल्या सत्रात थलायवाजने १२ मिनिटांत स्टीलर्सला दोनदा ऑलआऊट केले. पण स्टीलर्सने पुनरागमन करत थलायवाजविरुद्ध सलग ११ गुण मिळवले आणि त्यांना सर्वबाद केले. या विजयासह थलायवाज संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे, तर स्टीलर्स २० गुणांसह सातव्या स्थानावर आहे.

Advertisement

तमिळ थलायवाजचा कर्णधार सुरजीत सिंगने हरयाणा स्टीलर्सला पहिल्या चढाईसाठी आमंत्रित केले. सामन्याला धमाकेदार सुरुवात झाली आणि सुपर १० मारणाऱ्या रोहित गुलियाला पहिल्याच चढाईत सुरजीतने डॅश दिला आणि तो स्वतः मॅटच्या बाहेर गेला. यानंतर चढाईत मनजीत आणि बचावात सुरजीतने चमकदार कामगिरी करत पाचव्या मिनिटाला स्टीलर्सला ९-२ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर सागरने आपल्या कलात्मकतेचे दर्शन घडवत सलग ३ टॅकल करत थलायवाजला १६-२ अशी आघाडी मिळवून दिली. सुरेंदर नाडाला बाद करून मनजीतने आपला ५० वा रेड पॉइंट मिळवला. विनयला सागरने टॅकल केले आणि थलायवाज संघाने हरयाणाला दुसऱ्यांदा ऑलआउट केले.

यानंतर हरयाणाने शानदार पुनरागमन करत थलायवाज संघाला ऑलआऊट केले. हरयाणाने शेवटच्या ७ मिनिटांत ११ गुण घेतले आणि थलायवाजला एकही गुण मिळाला नाही. के. प्रपंजनने एकाच चढाईत दोन गुण घेत थलायवाजला २२-१७ ने पुढे नेले. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला थलायवाजने हरयाणाला ऑलआऊट करत २९-१८ अशी आघाडी घेतली. यानंतर खेळ थोडा मंदावला आणि दोन्ही संघ प्रत्येकी एक गुण वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते. मात्र, तमिळ थलायवाजने कोणतीही चूक न करता आघाडी कायम राखली.

Advertisement

हेही वाचा – IND vs SA FINAL Test : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन, मॅचची वेळ, हवामान आणि…; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर!

Advertisement

तमिळ थलायवाज मागे पडल्यानंतर हरयाणाने सतत डू किंवा डायवर खेळण्यास सुरुवात केली. अजिंक्य पवारने गुण घेत संघाला १३ गुणांची आघाडी मिळवून दिली. अजिंक्य पवारने चौथ्यांदा यशस्वी चढाई करत हरयाणाला ऑलआऊट केले. यानंतर सुरजीतने शानदार टॅकल करत हाय-५ पूर्ण केला. यानंतर हरयाणाने थलायवाजची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला पण १९ गुणांच्या फरकाने त्यांनी सामना ४५-२५असा गमावला. या सामन्यात थलायवाजच्या दोन बचावपटूंनी त्यांचे हाय-५ पूर्ण केला, तर मनजीतने सुपर १० पूर्ण केला.

The post Pro Kabaddi League : तमिळ थलायवाजनं हरयाणाच्या आक्रमणाला रोखलं; ४५-२६ असा उडवला धुव्वा! appeared first on Loksatta.

Advertisement

Source link

Advertisement