Pro Kabaddi League : अटीतटीच्या लढतीत जयपूरनं दिल्ली जिंकली; दीपक हुडाची निर्णायक खेळी!


जयपूर पिंक पँथर्सनं दबंग दिल्लीला ३०-२८ अशी धूळ चारली.

Advertisement

जयपूर पिंक पँथर्सने प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल) ४६व्या सामन्यात दबंग दिल्लीचा ३०-२८ असा पराभव करत रोमांचक विजय नोंदवला. दबंग दिल्लीचा या मोसमातील हा पहिला पराभव असला तरी ते अजूनही पहिल्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, जयपूर पिंक पँथर्स या विजयासह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

नवीन कुमारने पीकेएलमध्ये ६०० रेड पॉइंट पूर्ण केले. ५३व्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला आणि त्याने ‘डुबकी किंग’ परदीप नरवालचा विक्रम मोडला. जयपूर पिंक पँथर्सच्या दीपक निवास हुडाने पीकेएलमध्ये आपले ९०० रेड पॉइंट पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. पूर्वार्धानंतर दोन्ही संघांचे गुण १२-१२ असे बरोबरीत होते. जयपूर पिंक पँथर्स आणि दबंग दिल्लीने एकमेकांना पुढे जाऊ दिले नाही. सर्वांच्या नजरा नवीन कुमार आणि अर्जुन देशवाल यांच्यावर होत्या, पण बचावफळीने दोघांनाही चांगला खेळ करू दिला नाही. एकीकडे अर्जुनने ४, तर नवीन कुमारने ३ गुण घेतले. दोन्ही खेळाडू २ वेळा बाद झाले.

Advertisement

उत्तरार्धातही सामना अतिशय संथ गतीने चालला, पण दबंग दिल्लीचा संघ जयपूर पिंक पँथर्सला ऑलआऊट करण्याच्या जवळ पोहोचला. नवीनने आपल्या चढाईत उर्वरित दोन्ही बचावपटूंना बाद केले आणि दबंग दिल्लीने जयपूर पिंक पँथर्सला प्रथमच ऑलआऊट केले. साहुल कुमारने जयपूर पिंकसाठी हाय ५ पूर्ण केले. याशिवाय, दीपक हुडा आणि अर्जुनच्या रेडमुळे जयपूरने दोन्ही संघांमधील अंतर लक्षणीयरित्या कमी केले. जयपूरचा संघ दिल्लीला ऑलआऊट करण्याच्या अगदी जवळ आला होता, पण आशू मलिकला बोनससह टच पॉइंट मिळाला आणि दिल्लीचा ऑलआऊट टाळला. यानंतर सुपर टॅकल करताना दिल्लीने नवीनला संजीवनी दिली.

हेही वाचा – Pro Kabaddi League : तमिळ थलायवाजनं हरयाणाच्या आक्रमणाला रोखलं; ४५-२६ असा उडवला धुव्वा!

Advertisement

मात्र, जयपूरच्या बचावफळीने प्रथम नवीन कुमारला बाद केले आणि नंतर दीपक हुडाने आपल्या चढाईत दोन बचावपटूंना बाद केले. अखेरीस, जयपूर पिंक पँथर्सने दबंग दिल्लीला ऑलआऊट केले आणि सामन्यात निर्णायक क्षणी आघाडी घेतली. जयपूरने सातत्याने नवीनला बाद केले आणि अखेरीस रोमहर्षक सामना जिंकला. नवीन कुमार २८ सामन्यांनंतर पहिल्यांदाच सुपर १० पूर्ण करू शकला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Advertisement

Source link

Advertisement