‘पीएम नरेंद्र मोदी’ पुन्हा एकदा होणार प्रदर्शित

PM Narendra Modi Movie
Image Source: India Today

सिनेमा हॉल पुन्हा उघडल्यानंतर थिएटरमध्ये रिलीज होणारा पहिला चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदींची बायोपिक ‘पीएम नरेंद्र मोदी’ असेल. विवेक ओबेरॉय यांनी पंतप्रधान मोदींची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 15 ऑक्टोबरला पुन्हा प्रदर्शित होणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आरंभाच्या काळापासून ते गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि शेवटी पंतप्रधान म्हणून होण्याचा नरेंद्र मोदी यांचा प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. या चित्रपटात बोमन इराणी, मनोज जोशी, प्रशांत नारायणन, बरखा बिष्ट, राजेंद्र गुप्ता आणि जरीना वहाब यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत.

Advertisement

‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाला गेल्या वर्षी मे मध्ये रिलीज करण्यात आले होते. ओमंग कुमार दिग्दर्शित या बायोपिकने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नव्हती. “या ऐतिहासिक क्षणाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे! शिवाय, काही राजकीय अजेंडामुळे, जेव्हा शेवटचा रिलीज झाला तेव्हा हा चित्रपट बर्‍याच जणांना पाहता आला नाही” असे निर्माते संदीप सिंग म्हणाले.

चित्रपट समीक्षक आणि चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर हा चित्रपट सिनेमागृहात पुन्हा प्रदर्शित होणार अशी माहिती दिली आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here