Shelf च्या एका कोपऱ्यात जेव्हा Slambook सापडते…

Image Source: Google

Tv समोर गाढवा सारखा लोळत होतो म्हणून आई म्हणाली तेवढं अस्ताव्यस्त झालेले bookshelf तरी आवरायला घे ? मी अगदी उत्साहाने पुलंचे विनोद, मिराजदारांच्या कथा, देसाईंचा इतिहास, ढसाळांचा विद्रोह व्यवस्थित लावायला घेतला तितक्यात shelf च्या एका कोपऱ्यात अगदी इतिहास जमा झालेले slambook मला दिसली. मी स्वतः फ्लॅशबॅक मोड मध्ये जाण्याच्या आधी जरा “young old group” ला सांगतो slambook म्हणजे आमच्या जनरेशन ला लागलेलं वेड होत ते, 10 वी संपायला आली की तो sad zone on होतो ना त्या sad zone चा हा एक भाग. ते आता नाही का तुमचा whatsapp group असतो बघा अमुक विद्यालयाची तमुक batch हे वर्ष आणि त्यात तुम्ही अगदी नॉस्टॅल्जिक फील घेऊन आठवणी share करत असता अगदी तस आम्ही देखील पुन्हा खरंच एकत्र भेटू का नाही पुन्हा एकाच वर्गात आपण शिकणार नाही ही भावनिक गोष्ट लक्षात ठेवून , असंख्य आठवणींचा केलेला साठा म्हणचे ही slambook.

हो आता जरी ती  खरचं भावनिक होण्यासारखी गोष्ट होती का हा प्रश्न पडतो पण तेंव्हा मात्र ती खरच भावनिक होती. आणि बऱ्याच दिवसांनी ती slambook माझ्या हाती पडली होती म्हणजे हा emotional troma आणि हा flashback mode जास्त वेळ चालणार याची जाणीव मला केंव्हाचीच झाली होती. 

Advertisement

हो कारण त्यात शाळेतील आठवणी होत्या कधी ही न संपाव्या वाटणाऱ्या. ती उघडल्यावर त्यातला स्वतःचा तो पासपोर्ट size फोटो, बाबांकडून रेखीव अक्षरात लिहून घेतलेलं नाव अजूनही तसंच ठळक आणि स्पष्ट आहे,मग काय आवडत्या व्यक्तीने भरलेलं पहिलं पान, वर्गात ज्या मुलीसोबत कायम भांडण व्हायचे तिला सॉरी म्हणून slam भरण्यासाठी केलेली request, मित्रांनी स्वतःच्या लायकी बाहेर लिहिलेल्या स्वप्नांवर हसणं, तोडक्यामोडक्या का होईना पण अगदी प्रेमाने मारलेल्या सह्या live long life साठी काढलेला तो मोठा L, आणि अगदी शेवटी तो class चा group फोटो. 

जेंव्हा शेवटचं पान बंद करण्याची वेळ आली तेंव्हा मात्र हात पुढे सरकत नव्हता  कारण पुन्हा ते दिवस कधीच येणार नाहीत ही खंत बाळगून तो थांबला होता, पण डोळ्यातील वाहणाऱ्या अश्रुंबरोबर एक जाणीव मात्र नक्की झाली की काही गोष्टी आठवणी म्हणून ठेवायच्या असतात. आता आपण शाळेतील मित्र touch मध्ये आहोत ना, whatsapp groups आमचे ही आहेत, instagram memes मध्ये टॅग देखील करतो एकमेकांना, अधूनमधून आम्ही भेटतो सुद्धा. हा पण आम्ही एकमेकांसोबत तो मनमोकळा संवाद साधला तो त्या “Slambook” मध्येच.

Advertisement

लेख आवडल्यास नक्की शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. तुमच्या कडे जर interesting लेख असतील तर आम्हाला [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवा.

Advertisement