NZ vs BAN : जबरदस्त..! न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचे कसोटीत ‘त्रिशतक’न्यूझीलंड क्रिकेट संघाचा महान वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ट्रेंट बोल्ट कसोटी क्रिकेटमध्ये ३०० बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. त्याने बांगलादेशविरुद्धच्या ख्राइस्टचर्च कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ५ बळी घेत हा ऐतिहासिक विक्रम केला. त्याने आपल्या ३०० कसोटी विकेट्सबाबत मोठे विधान केले आहे. रेकॉर्ड्समुळे मला काही फरक पडत नाही आणि या यादीत अनेक मोठी नावे समाविष्ट आहेत, असे त्याने म्हटले.

Advertisement

ट्रेंट बोल्टने याआधी ७४ सामन्यात २९६ कसोटी बळी घेतले होते. आपल्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल एक मोठे विधान देताना तो म्हणाला, “विक्रमाचा फारसा फरक पडत नाही. या यादीत अनेक महान खेळाडू आहेत. खेळपट्टीवरून उत्कृष्ट वेग आणि उसळी मिळत होती आणि अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांवर मला टिम साऊदीसोबत गोलंदाजी करणे मजेदार असते. मी फक्त माझ्या अचूक टप्प्यावरील गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करत होतो.”

हेही वाचा – धोनीचा अपमान करणं KKRला पडलं महागात; भडकलेल्या चाहत्यांनी गंभीरची घेतली शाळा, तर जडेजानं…

Advertisement

या कसोटी सामन्यात यजमान न्यूझीलंडने बांगलादेशवर आपली पकड पूर्णपणे घट्ट केली आहे. न्यूझीलंडने पहिला डाव ६ बाद ५२१ धावांवर घोषित केला. टॉम लाथमने उत्कृष्ट द्विशतक झळकावले आणि प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या १२६ धावांवर आटोपला आणि किवींनी ३९५ धावांची आघाडी घेतली. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने ५ तर टिम साऊदीने ३ विकेट्स घेतल्या.

The post NZ vs BAN : जबरदस्त..! न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचे कसोटीत ‘त्रिशतक’ appeared first on Loksatta.

Advertisement

Source link

Advertisement