NZ vs BAN: एकाच चेंडूत सात धावा दिल्याने बांगलादेशी खेळाडू झाले ट्रोल; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलबांगलादेशचा संघ न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याच्या मोहिमेवर आहे. माउंट माँगुई येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने न्यूझीलंडला त्याच्या घरच्या मैदानावर पराभूत करून इतिहास रचला. बांगलादेशचा संघ क्राइस्टचर्च येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवण्याच्या उद्देशाने उतरला आहे. बांगलादेशचा संघ कसोटी मालिका जिंकण्यासाठी खूप मेहनत घेत आहे, पण या सगळ्यात मैदानावरील चुकांमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

Advertisement

बांगलादेशच्या खेळाडूंनी पहिली कसोटी ८ गडी राखून जिंकताना एलबीडब्ल्यूसाठी डीआरएस घेत आपले हसु केले होते. कारण फलंदाज रॉस टेलरने तो चेंडू आपल्या बॅटने खेळला होता. रविवारी दुसऱ्या कसोटीतही असेच काहीसे घडले. पाहुण्या संघाने क्षेत्ररक्षण करताना चूक केली आणि अवघ्या एका चेंडूत फलंदाज विल यंगला सात धावा दिल्या.

न्यूझीलंडच्या डावाच्या २६ षटकांच्या शेवटच्या चेंडूवर ही विचित्र घटना घडली. न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंगने बॅटने चेंडूला कट मारला आणि तो स्लिपमध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला. पण तो चेंडू पकडण्यात अपयशी ठरला आणि चेंडू फाइन लेगच्या सीमारेषेपर्यंत पोहोचला. यादरम्यान क्रीजवर असलेले विल यंग आणि टॉम लॅथम यांनी तीन धावा काढल्या.

Advertisement

मात्र, त्यानंतर क्षेत्ररक्षकाने यष्टिरक्षक नुरुल हुसेनकडे चेंडू फेकला. विल यंगला बाद करण्याच्या प्रयत्नात हुसेनने चेंडू नॉन स्ट्रायकरच्या दिशेने फेकला. यादरम्यान चेंडू रोखण्यासाठी कोणीही नव्हते आणि चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला. बांगलादेशी क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण तो पकडू शकला नाही. न्यूझीलंडला ओव्हर थ्रोच्या रूपात चौकार मिळाला आणि त्यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी एका चेंडूत सात धावा घेतल्या.

दरम्यान, याआधी वेगवान गोलंदाज इबादत हुसैनने ४६ धावांत ६ बळी ही कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना बांगलादेशला विश्वविजेत्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आठ गडी राखून शानदार विजय मिळवून दिला होता.

Advertisement

इबादतने सामन्याच्या पाचव्या दिवशी न्यूझीलंडचा दुसरा डाव १६९ धावसंख्येत संपवण्यात सिंहाचा वाटा उचलला. मग ४० धावांचे विजयी लक्ष्य बांगलादेशने दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारीत नवव्या स्थानावरील बांगलादेशचा हा परदेशातील सहावा कसोटी विजय ठरला. याचप्रमाणे क्रमवारीतील अव्वल पाच क्रमांकांमधील संघावरील हा पहिला विजय ठरला. जागतिक कसोटी र्अंजक्यपद विजेता न्यूझीलंड हा संघ सध्या कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. याचप्रमाणे न्यूझीलंडची मायदेशातील कसोटी विजयांची मालिका १७ सामन्यांनंतर खंडित झाली.

The post NZ vs BAN: एकाच चेंडूत सात धावा दिल्याने बांगलादेशी खेळाडू झाले ट्रोल; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल appeared first on Loksatta.

Advertisement

Source link

Advertisement