वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी उत्तराखंड पर्यटनाकडून नवीन ऑफर, वाचा पूर्ण माहिती

Work from Home
Image Source: Google Images

उत्तराखंड पर्यटनाचा नवीन उपक्रम ऐकून ‘वर्क फ्रॉम होम’ करणारे नक्कीच आनंदी होतील. घरातून काम करून थकलेल्या या सर्वांना आता त्यांचा कंटाळवाणा सेटअप बदलण्याचा आकर्षक पर्याय मिळू शकेल.

उत्तराखंड पर्यटन ‘वर्ककेशन’ या अनोख्या संकल्पनेची जाहिरात करीत आहे ज्यात तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहून काम करु शकता. उत्तराखंड टूरिझम वर्ककेशनवर जाण्याची निवड करणाऱ्यासाठी ‘टूरिस्ट इंसेंटिव्ह’ कूपन लाँच करणार आहे. योजनेनुसार, किमान तीन दिवस मुक्काम करणाऱ्या सर्वांना ₹३००० ची सवलत देण्यात येईल.

Advertisement

तुमच्याकडे फक्त वर्क फ्रॉम होम आणि चांगले इंटरनेट कनेक्शन पाहिजे. उत्तराखंड टूरिझम सॅनिटाईज्ड रिसॉर्ट्स, हॉटेल्स आणि होमस्टेजचीही ऑफर देत आहे. या सोबतच वैद्यकीय सुविधा, रुम सर्विस, पौष्टिक अन्न, पावर बॅकअप देखील देते.

पर्यटकांनी कोवीड-१९ चे प्रोटोकॉल आणि गाईडलाईन्स पाळत आहेत याची खात्री देने आवश्यक आहे. ज्यांना उत्तराखंड मध्ये फिरायला जायचे आहे त्यांनी स्मार्ट सिटी पोरटल वर स्वतःला रजिस्टर करावे आणि मग त्यांना राज्यात प्रवेश करण्यासाठी कोवीड-१९ निगेटिव्ह रिपोर्ट ची गरज नाही.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here