भारतातून आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यासाठी नवी मार्गदर्शक सूचना

Image Source: Google Images

युरोपमधील कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय आगमनासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

बातमीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रवाश्यांनी त्यांच्या प्रवासाच्या ७२ तासाच्या आत निगेटिव्ह आरटी-पीसीआर रिपोर्ट सादर केल्यास त्यांना क्वारंटाईन होण्याची आवश्यकता पडणार नाही.

Advertisement

जारी केलेल्या परिपत्रकानुसार असे म्हटले आहे की, “त्यांनी पोर्टलवर किंवा अन्यथा नागरी उड्डयन मंत्रालय, भारत सरकार यांना संबंधित एअरलाइन्समार्फत हमीपत्र द्यावे. “

भारतात विमानातून प्रवास करताना आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे

Advertisement

क्वारंटाईन पासून सूट मिळविणार्‍यांसाठी, ते त्यांच्या नियोजित प्रवासाच्या किमान ७२ तास अगोदर ऑनलाईन स्वतः जबाबदारी घेत असल्याचा फॉर्म सबमिट करू शकतात.

ज्यांना प्रस्थान होण्यापूर्वी आरटी-पीसीआर चाचणी घेता आली नाही आणि क्वारंटाईनपासून सूट मिळावी अशी इच्छा आहे, त्यांना विमानतळावर सुविधा मिळू शकेल आणि तेथेच तशी तरतूद आहे.

Advertisement

आतापर्यंत अशा विमानतळांमध्ये मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि कोचीनचा समावेश आहे.

हे केंद्र सरकारने जारी केलेले नवीन मार्गदर्शक सूचना असल्या तरी परदेशातून प्रवास करणार्‍या प्रवाशांना क्वारंटाईन ठेवणे व आयसोलेट करण्याचा नियम ठेवायचा की नाही ही प्रत्येक राज्याची स्वतंत्र जिम्मेदारी आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here