नेपाळ मध्ये गिर्यारोहण पुन्हा झाले सुरू. पहा काय आहेत नियम

Image Source: Google Images

नेपाळने पुन्हा एकदा गिर्यारोहण सुरू केले आहे. सर्व गिर्यारोहणाच्या क्रिया कोरोनाव्हायरस आजारामुळे थांबविण्यात आल्या आणि आता मार्चनंतर ते पुन्हा प्रथमच उघडले आहे.

नेपाळ पर्वतारोहण पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत असताना अजूनही काही निर्बंध आहेत. आत्ता उंच पर्वतांचा ट्रेक करण्याची महत्वाकांक्षा घेऊन आलेल्या पर्यटकांनाच परवानगी दिली जाईल.

Advertisement

पर्यटकांकडे अगोदरच व्हिसा असणे तसेच ७२ तास आधी केलेल्या कोविड -१९ पीसीआर टेस्टचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, पर्यटकांकडे सात दिवसा क्वारंटाईन होण्यासाठी हॉटेल बुकिंग तयार असणे आवश्यक आहे.

माउंट एव्हरेस्टसह नेपाळचे पर्वत, शरद ऋतूतील मोसमात म्हणजेच सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात चढण्यासाठी चालू केले आहे. नेपाळमधील सरकारने ऑगस्टपासून माउंट एव्हरेस्ट आणि इतर पर्वतांसाठी परवाने देणे सुरू केले होते.

Advertisement

हिमालय हा सर्व अभ्यागतांसाठी खुला नाही तर केवळ पर्वतारोहण आणि ट्रेकर्ससाठीच आहे तेही फक्त पूर्वी परवानगी घेतली आहे त्यांच्यासाठीच.

गिर्यारोहक आणि ट्रेकर्स बरोबरच मदतनीस, मार्गदर्शक, पोर्टर, कुक किंवा त्यांच्या सोबत इतर कोणीही असले तरी त्यांना ही कोविड -१९ टेस्ट करून घेणे आवश्यक आहे.

Advertisement

शिवाय, त्यांना हे सिद्ध करणे आवश्यक आहे की गेल्या दोन आठवड्यांमध्ये ते कोविड-१९ च२ संसर्ग झालेल्या क्षेत्रात गेले नाहीत.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here