देशातील पर्यटन आकर्षण म्हणून अयोध्या विकसित होत आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार सरयू नदीवर लक्झरी क्रूझ राईड आणण्याची योजना आखत आहे. रामायणातील वैभवाचे दर्शन घडविणारा क्रूज पुढील दिवाळीपर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे.
बंदर, नौवहन व जलवाहतूक मंत्रालयाने सांगितले की जलपर्यटन सेवा त्वरित राबविण्यासाठी बैठक घेण्यात आली. मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “पवित्र सरयू नदीच्या प्रसिद्ध घाटातून एक प्रकारचा अध्यात्मिक प्रवास करून भाविकांना मंत्रमुग्ध करण्याचा अनुभव आहे.” क्रूझ पर्यटकांना अयोध्येत नुकत्याच बांधलेल्या राम मंदिराचे तसेच राम पुतळा व राम कॉरिडॉरचे भव्य दर्शन देणार आहे.
मुख्य वैशिष्ट्ये
१) रामायण क्रूझ – ८० सीटर लक्झरी क्रूझ असेल.
२) हे पेंट्री आणि किचनमध्ये सुसज्ज असेल.
३) सुरक्षा ही जागतिक दर्जाची असेल.
४) रामचरितमानसातील वर्णनांनुसार अंतर्गत रचना केली जाईल.
५) प्रचंड काचेच्या पॅनेल्सनी वेढलेले हे जलपर्यटन सरयू घाटांची अप्रतिम दृश्ये देईल.
६) यात हायब्रीड इंजिन आणि बायो-टॉयलेट्स आहेत.
७) हा प्रवास सरयू नदीवर सुमारे १५ कि.मी. अंतराचा असेल.
८) तुळशीदास यांच्या रामचरितमानसवर आधारित लोकांना ४५ ते ६० मिनिटांची फीचर फिल्म दाखवली जाईल.
९) यात पर्यटकांसाठी सेल्फी पॉईंट्स देखील ठेवण्यात येतील.
अयोध्येत सुशोभिकरण करण्यासाठी आणि जागतिक पर्यटनस्थळ बनवण्यासाठी सरकारने यापूर्वी प्रचंड पायाभूत सुविधा जाहीर केल्या आहेत. लवकरच या शहरात आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल आणि सत्संग भवन आणि दशरथ महालचे बांधकाम सुरू आहे. या अहवालानुसार या प्रकल्पासाठी २४२ लाख रुपये देण्यात आले आहेत.