LinkedIn आणि UN Women च्या सहयोगाने भारतातील महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणार


Advertisement

LinkedIn & UN Women : लिंक्‍डइन या जगातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक नेटवर्कने आज महत्वाची घोषणा केली आहे. लिंक्डइन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लैंगिक समानतेशी समर्पित युनायटेड नेशन्‍स कंपनी यूएन विमेनसोबतच्‍या (UN Women) तीन वर्षांच्‍या प्रादेशिक सहयोगामध्‍ये 3.88 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. महत्वाचं म्हणजे या प्रकल्पाला महाराष्ट्रातून सुरुवात होणार आहे. हा प्रकल्‍प 2,000 महिलांच्‍या डिजिटल, सॉफ्ट आणि रोजगारक्षम कौशल्‍यांना चालना मिळवून देईल. तसेच, महिलांसाठी रोजगार मेळावे, मार्गदर्शन सत्रे या नेटवर्कच्या माध्यमातून करिअर घडविण्याची संधी देईल. 

54.6 टक्‍के पुरूषांच्‍या तुलनेत 41.3 टक्‍के महिलांना इंटरनेट उपलब्‍ध होते. यामधून 32 टक्‍के लैंगिक पोकळी दिसून येते. इंटरनॅशनल टेलिकम्‍युनिकेशन्‍स युनियनच्‍या मते, 2013 ते 2017 दरम्‍यान आशियामधील लैंगिक पोकळी 17 टक्‍क्‍यांवरून 24 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचली. महिलांना तसेच मुलींना अनेकदा पुरुषांच्या तुलनेत डिजिटल युगामध्‍ये कमी आर्थिक संधी मिळतात. कोरोना काळात तर या पोकळीत आणखी वाढ निर्माण झाली आहे. हीच पोकळी भरून काढण्याचे काम लिंक्डइन आणि यूएन विमेन या संस्था करणार आहेत. 

Advertisement

या संदर्भात लिंक्‍डइनचे भारतातील कंट्री मॅनेजर आशुतोष गुप्‍ता (Ashutosh Gupta, India Country Manager, LinkedIn) म्‍हणाले की, आम्‍हाला यूएन विमेनसोबत सहयोग करत महिलांचे अपस्किलिंग आणि आर्थिक सक्षमीकरणामध्‍ये गंतवणूक करण्‍याच्‍या माध्‍यमातून प्रदेशाच्‍या कर्मचारी वर्गामध्‍ये महिला प्रतिनिधित्‍व आणि व्‍यावसायिक विविधता सुधारण्‍याप्रती सहयोगाने काम करण्‍याचा आनंद होत आहे. महिलांना योग्‍य कौशल्‍ये आणि संसाधने देत आम्‍ही अधिक समान आणि सर्वसमावेशक टॅलेण्‍ट क्षेत्र निर्माण करण्‍याची आशा करतो”. 

यूएन विमेन त्‍यांच्‍या सहयोगांचा लाभ घेत तरूण महिलांना उद्योगांमध्‍ये सुलभ संधी देईल, जेथे त्यांचे लिंक्‍डइन व्‍यासपीठ ऑपरेट करण्‍यावर आणि कनेक्‍शन्‍स निर्माण करण्‍यावर लक्ष केंद्रित आहे. तर, यूएन विमेन इंडियाच्‍या देशातील प्रतिनिधी सुझान फर्ग्‍युसन म्‍हणाल्‍या की, ”महिला आणि मुलींना उत्तम रोजगार आणि उद्योजक संधी मिळण्‍याकरिता दर्जेदार शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. लिंक्‍डइनसोबत सहयोगाने लिंक विमेन प्रकल्‍पाचा महिलांचा समूह तयार करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे महिला नवीन डिजिटल आणि रोजगारक्षम कौशल्‍ये आत्‍मसात करतील आणि त्‍यांना उत्तम रोजगार मिळतील”.

Advertisement

महत्वाच्या बातम्या : 

Advertisement



Source link

Advertisement