पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच सारनाथच्या धमेख स्तूपात लाईट अँड साऊंड शोचे उद्घाटन केले.
पर्यटन विभागाने या प्रकल्पाच्या संपूर्ण प्रकल्पासाठी ७.९९ कोटी खर्च केले आहेत ज्याचे उद्दीष्ट दर्शकांना अधिक आकर्षित करणे, चांगले उत्पन्न मिळविणे आणि बुद्धांच्या जीवनाशी संबंधित वारसा स्थळांविषयी जागरूकता पसरवणे आहे.
प्रादेशिक पर्यटन अधिकारी कीर्तिमान श्रीवास्तव यांनी सांगितले की गौतम बुद्धांच्या जीवनाची आणि त्याच्या शिकवणुकीची कथा सांगण्यासाठी लाइट अँड साऊंड शोची संकल्पना आखली गेली आहे.
गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर त्यांचा पहिला उपदेश सारनाथ ह्या ठिकाणी दिला होता. दिवसभरात सारनाथला बरेच परदेशी पर्यटक भेट देतात. पर्यटन विभागाला सायंकाळी लाईट अॅण्ड साऊंड शो सादर करून पर्यटक वाढवण्याची अपेक्षा आहे.
विशेष म्हणजे बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमाला व्हॉईसओव्हर दिला आहे. सारनाथ उत्तर प्रदेशात वाराणसीपासून १० कि.मी. अंतरावर आहे. वाराणसी किंवा काशीला भेट देणारे बरीच लोक सारनाथला जाणे पसंत करतात.
लाईट अँड साऊंड शो ची वेळ : सायंकाळी ७:०० ते ८:००