IPL – A Game Of Emotions

Image Source: Google

अवघड आकडयातील ती कोट्यवधींची उलाढाल, दरवर्षी होणारे काही ना काही तरी घोळ, देवाकडे घातलेले साकडं, भिंतीवर चिटकवलेलं वेळापत्रक, ज्योतिषाने मांडलेली भाकीतं, तिकीटांसाठी लागलेल्या रांगा, केबलवाल्या शी झालेले भांडणं, प्रोजेक्टर साठी रूम वर केलेली खटाटोप, मित्रांसोबत झालेले भांडण आणि बरंच काही….. 

एक मैदानी खेळ एका व्यक्ती मध्ये इतके भावनिक बदल आणू शकले याची खरंच कल्पना सुद्धा कधी कुणी केली नसावी. हा म्हणजे त्याला कारणं पण तशीच आहेत प्रत्येक वयोगटातील प्रत्येक व्यक्ती साठी उन्हाळा आणि IPL हे एक समीकरणच बनून बसलय. इतक्या दिवस नेहमी हा भारताच्या गोलंदाजांना मारतो म्हणून त्या रिकी पॉंटिंग वर चिंडणारे जोशी काका, आज तो आऊट चं होऊ नये म्हणून नवस बोलायला लागले कळचं नाही.

Advertisement

त्या तांबडे काकू आज मलिंगा मलिंगा नावाचा 21 माळी जप करतात, एका हैद्राबाद च्या झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या त्या खलील अहमद च्या घरी तो आफ्रिकेचा Devellers मांडी घालून बिर्याणी खातो ही खरंच कल्पनेच्या बाहेरची गोष्ट नव्हे का? 

भारताच्या एका star अभिनेत्री सोबत तो ख्रिस गेल कसल्या तरी wahsing powder ची जाहिरात करतो ह्या पेक्षा humorous गोष्ट शोधून ही सापडणार नाही, एका साडी विक्रेत्याच्या मुलाला कधी स्वप्नात देखील वाटलं नसावं की आपण अंबानी च्या घरी जेवायला जाऊ. आपली टीम हरली की रडू येत जिंकली की आपला आनंद गगनात मावत नाही, हा मैदानावरचा IPL कधी भावनांपर्यंत पोचला ही कुणालाच कळलं नाही. पण मैदान ते भावना या 12 वर्ष्याच्या प्रवासावर का छोटासा विषाणू पाणी फेरेल हे कधीच वाटलं नव्हतं. 

Advertisement

उन्हाळ्यात दिवस खायला उठत असला तरी रात्र मात्र match पाहायला आहे याचं भावनेने दिवस ही निघून जायचा पण आजची परिस्थिती खरंच वेगळी आहे, आता तर जुन्या match च्या highlights सुद्धा पाठ झाल्यात पण काही गोष्टी हातात नसतात याची जाणीव सुद्धा आहे. ते लोक म्हणतात ना भारतीय लोक एकत्र येतात ते फक्त क्रिकेट मुळे, हो खरंय, जोशी काकांसारखा प्रत्येक भारतीय क्रिकेट प्रेमी पुन्हा भारतात त्याच उत्साहाने IPL खेळल जावं यासाठी घरात बसतात हे ही तितकंच खरंय.

बाकी काय देवाकडे आपण एकचं विनंती करू शकतो की लवकरात लवकर हा धोका टळावा आणि IPL सुरू व्हावं एवढीच इच्छा आहे. त्याच काय आहे ना देवा “आख्या उन्हाळा संपला पण आपण हापूसचं खाल्ला नाही” ही हुरहूर नको लागायला.

Advertisement

लेख आवडल्यास नक्की शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. तुमच्याकडे जर interesting लेख असतील तर आम्हाला [email protected] या इमेल आयडी वर पाठवा. 

Advertisement