IPL 2022 : श्रेयस अय्यरचा पत्ता कट..! ‘हा’ मुंबईकर क्रिकेटर होणार नव्या अहमदाबाद संघाचा कॅप्टन!


यासोबतच सनरायझर्स हैदराबादचा दिग्गज खेळाडूही अहमदाबाद संघात जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

Advertisement

आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) हंगामापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, हार्दिक पंड्या नवीन अहमदाबाद फ्रेंचायझीचा कर्णधार असेल. यावेळी मुंबई इंडियन्सने हार्दिकला रिटेन केले नाही. यापूर्वी असे वृत्त होते, की दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार आणि मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यरकडे अहमदाबादची कमान सोपवली जाऊ शकते.

अहमदाबाद फ्रेचायझी आपल्या संघाची कमान वडोदराचा अष्टपैलू खेळाडू हार्दिककडे सोपवू शकते. यासोबतच सनरायझर्स हैदराबादचा माजी लेगस्पिनर राशिद खानही या संघात सामील होऊ शकतो. राशिदने कथित वादांमुळे हैदराबाद संघ सोडला. हैदराबादने केन विल्यमसनला रिटेन केले. पाठीच्या दुखापतीमुळे पांड्याला पूर्वीप्रमाणे गोलंदाजी करता येत नाही आणि फलंदाजीतही त्याचा फॉर्म खराब आहे, त्यानंतर त्याला टीम इंडियातूनही वगळण्यात आले.

Advertisement

राशिद खानचा आयपीएल रेकॉर्ड अप्रतिम आहे. या लेग-स्पिनरने ७६ सामन्यांत ९३ बळी घेतले आहेत आणि इकॉनॉमी रेट प्रति षटक फक्त ६.३३ धावा असा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सचा आणखी एक खेळाडू अहमदाबाद संघात जाणार आहे. यष्टीरक्षक इशान किशन अहमदाबाद फ्रेंचायझीचा तिसरा ड्राफ्ट खेळाडू असू शकतो. इशान स्फोटक सलामीवीरही आहे. त्याला नुकतेच भारतीय संघातही स्थान मिळाले आहे. इशानने ६१ आयपीएल सामन्यात १४५२ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IND vs SA : ‘‘धोनी म्हणाला होता, की…”, कॅप्टन कूलचा ‘तो’ सल्ला विराटनं आजही ठेवलाय लक्षात!

यावर्षी आयपीएलमध्ये एकूण १० संघ असतील. गेल्या महिन्यात, संघांनी त्यांच्या पसंतीच्या जास्तीत जास्त चार खेळाडूंची यादी आयपीएल व्यवस्थापनाला सादर केली. लखनऊ आणि अहमदाबाद संघांना या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्यांच्या काही खेळाडूंची यादी सादर करायची आहे. यावेळी आयपीएलमध्ये मेगा लिलाव होत आहे. ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे लिलाव होणार आहे.

Advertisement

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Source link

Advertisement