iPhone युजर्ससाठी खूशखबर! iPhone 13 वर मिळतेय बंपर ऑफर; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत


Advertisement

iPhone 13 Best Deal In Flipkart : जर तुम्हाला Apple चा नवीन फोन घेण्याच्या विचारात असाल तर ही ऑफर तुमच्यासाठी आहे. सध्या फ्लिपकार्टवर एंड ऑफ सीझन (Flipkart end of season) सेल सुरू झाला आहे, ज्यामुळे तुम्ही अनेक ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर उत्तम सूट मिळवू शकता आणि ते अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता. या ऑफरमध्ये तुम्हाला 22 हजारांहून जास्त डिस्काउंटमध्ये iPhone 13 विकत घेण्याची संधी मिळतेय. काय आहे नेमकी ही ऑफर जाणून घ्या. 

iPhone 13 च्या 128GB इंटर्नल स्टोरेजबाबब बोलायचे झाल्यास याची किंमत 79,900 रुपये आहे. पण फ्लिपकार्ट एंड ऑफ सीझन सेलमध्ये तुम्हाला 7% सूट देऊन हा स्मार्टफोन 73,999 रूपयांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही Axis Bank क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 10% म्हणजेच 750 रूपयांची झटपट सूट मिळेल. अशा प्रकारे तुम्ही 73,249 रुपयांमध्ये iPhone 13 घरी नेऊ शकता.

Advertisement

22 हजार रुपयांपेक्षा जास्त सवलतीसाठी काय करावे?
 
तुम्हाला प्रश्न पडला असेल की, iPhone 13 वर 22 हजार रुपयांची सूट कशी मिळेल? तर, या फोनवर एक्सचेंज ऑफरसुद्धा सुरू आहे. जर तुम्ही तुमच्या जुन्या फोनची देवाणघेवाण करून हा फोन खरेदी केला तर तुम्हाला 15,500 रुपयांपर्यंत बचतीचा लाभ मिळू शकतो. या सर्व ऑफर लागू करून, या फोनची किंमत 57,749 रुपये असेल आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या आवडीच्या फोनवर 22,151 रुपयांची सूट मिळू शकते.

iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स :

Advertisement

या डीलमध्ये iPhone 13 च्या 128GB स्टोरेज व्हेरिएंटबद्दल बोलले जात आहे. हा स्मार्टफोन A15 बायोनिक चिपवर काम करतो. या 5G फोनमध्ये 13 6.1 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. यासोबतच फोनमध्ये रियर कॅमेरा सेटअप आणि 12MP चे दोन सेन्सर देण्यात आले आहेत. यामध्ये फ्रंट कॅमेरा देखील 12MP चा आहे. ड्युअल सिम सेवेसह या फोनमध्ये एक वर्षाची वॉरंटीही मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

AdvertisementSource link

Advertisement