IndiaVsEngland 4th Test : भारताचा इंग्लंडविरुद्ध 157 धावांनी दणदणीत विजय


Advertisement

IndiaVsEngland 4th Test : भारताने चौथ्या ओव्हल कसोटीत दणदणीत विजय साजरा केला आहे. भारताने इंग्लंडचा 157 धावांनी पराभव केला. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही बाजूने टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने 50 वर्षांनंतर ओव्हलमध्ये ऐतिहासिक विजय साजरा केला.  

दुसऱ्या डावात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांनी 100 धावांची भागीदारी केली. मात्र हे सातत्य मधल्या फळीतील खेळाडूंना राखता आलं नाही. इंग्लंडकडून हासीब हमीदने 193 चेंडूत सर्वाधिक 63 धावा केल्या. तर रॉरी बर्न्सने 125 चेंडूत 50 धावा केल्या. कर्णधार जो रुटने 36, ख्रिस वोक्सने 18, क्रिग ओव्हर्टन 10, ओली रॉबिनसनने 10 धावा केल्या. मधल्या फळीतील खेळाडू भारतीय गोलंदाजांसमोर खेळपट्टीवर टीकू शकले नाहीत. भारताकडून दुसऱ्या डावात सर्वाधिक 3, जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

Advertisement

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिकेत आता भारताने आघाडी घेतली आहेत. मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत होता. त्यानंतर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात 151 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. तर तिसऱ्या कसोटी भारताने 76 धावांनी गमावली. ज्यामुळे मालिका आता 1-1 अशा बरोबरीत आली आहे. आता चौथी कसोटी जिंकत भारताने पुन्हा एकदा 2-1 आघाडी मिळवली आहे. 

AdvertisementSource link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here