केरळ मध्ये सुरु झाली सौर उर्जेवर चालणारी भारतातील पहिली ट्रेन, वाचा संपूर्ण माहिती

Image Source: Google Images

भारताला नुकतीच सौर उर्जेवर चालणारी पहिली ट्रेन मिळाली. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी नुकतीच केरळमधील वेली टूरिस्ट व्हिलेजमध्ये त्याचे उद्घाटन केले.

बातमीनुसार, ही ट्रेन २ कि.मी. रेल्वे मार्गावर चालेल आणि प्रवाश्यांना थिरुवंनतपुरमच्या निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद घेण्याची संधी मिळेल. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, १० कोटींचा हा प्रकल्प देशातील पहिलाच प्रकल्प आहे.

Advertisement

अहवालानुसार ट्रेनमध्ये तीन डबे असून एकावेळी सुमारे ४५ प्रवासी बसू शकतील. पर्यटनमंत्री कडकंपल्ली सुरेंद्रन यांनी माहिती दिली की, राज्य शासनाने गावच्या नूतनीकरणासाठी ६० कोटी रुपये दिले आहेत.

तसेच, २.५ कोटी किंमतीचा स्विमिंग पूल, तसेच ५ कोटी रुपये किंमतीचे उद्यान गावच्या लोकांसाठी विकसित केले आहे. स्टेशन हाऊसची रचना पारंपारिक पद्धतीने केली गेली आहे, तर यंत्रणेतून निर्माण होणारी अतिरिक्त ऊर्जा केरळ राज्य विद्युत मंडळाच्या ग्रीडमध्ये जाईल.

Advertisement

विकास कामांबद्दल अधिक माहिती देताना विजयन यांनी सांगितले की अधिवेशन केंद्रात डिजिटल प्रदर्शन सुविधा, एक आर्ट गॅलरी आणि ओपन-एअर थिएटर बनवले जाईल जे वेली गावाचा देखावा वाढवेल.

प्रकल्पांविषयी, इतर कामे प्रगतीपथावर असताना २० कोटी रुपयांची कामे आधीच पूर्ण झाली असून, पर्यटन सुविधा केंद्र जानेवारीत उघडण्यात येणार आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here